गुहागर, ता. 17 : शरदचंद्रजी पवार कृषी महाविद्यालय, खरवते- दहीवली च्या कृषी कण्यांनी नांदगांव गावात ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रम (RAWE) अंतर्गत वेगवेगळी प्रात्यक्षिके दाखवली जात आहेत, त्यामध्ये ब्राम्हणवाडी येथील श्री. गोपाळ जयंत जोशी यांच्या निवासस्थानी यशस्वीरीत्या अळंबी उत्पादनाचा प्रयोग घेण्यात आला. यावेळी गावातील काही शेतकरीही उपस्थित होते. Agriculture students success in alambi production
हे प्रात्यक्षिक शरदचंद्रजी पवार कृषी महाविद्यालयाचे प्राध्यापक श्री. संग्राम ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले. कमी जागेत व सेंद्रिय प्रकारे जास्तीत जास्त उत्पादन कसे घेता येईल तसेच गावातील शेतकऱ्यांना एक जोडधंदा म्हणून सुद्धा हा पर्याय होईल हा या प्रात्यक्षिक घेण्यामागचे उद्दिष्ट होते. हे प्रात्यक्षिक घेण्यासाठी कृषीकण्या विद्यार्थीनी कु. आकांक्षा पाटील, कु. सानिका पिलणकर, कु. नेत्रम शिंदे, कु.श्रावणी मांजर्डेकर, कु. सरस्वती घरबुडवे, कु.निधी सावंत यांचा सहभाग होता. Agriculture students success in alambi production