गुहागर, ता. 03 : तालुक्यातील आबलोली गावचे शिक्षण महर्षी आणि माजी सभापती श्री. चंद्रकांतशेठ ऊर्फ आबा बाईत यांची सुन व लोक शिक्षण मंडळ आबलोली या संस्थेचे कार्याध्यक्ष आणि शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख श्री. सचिन बाईत यांची पत्नी सौ. स्नेहल सचिन बाईत यांची रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापती पदी निवड झाली आहे. या निवडीबद्दल आबलोली गावासह गुहागर तालुक्यातून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतं आहे. Agriculture Produce Market Committee Deputy Chairman Snehal Bait
सौ. स्नेहल बाईत यांनी चौंडेश्वरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन पद भूषविले आहे. तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील नावाजलेल्या लोक शिक्षण मंडळ आबलोली या संस्थेच्या त्या संचालिका आहेत. आबलोली खोडदे विविध कार्यकारी सोसायटी, शेळी मेंढी पालन संस्था, कुक्कुट पालन संस्था आणि रत्नागिरी जिल्हा शेतकरी कात उत्पादक सहकारी संस्था या संस्थांवर त्या संचालक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी निर्मल ग्रामपंचायत आबलोली या ग्रामपंचायतीच्या उपसरपंच म्हणून देखील उल्लेखनीय कामगिरी करून आपल्या कामाचा ठसा उमटवलेला होता. तसेच वेगवेगळ्या सामाजिक संघटना, सहकार, शिक्षण यामध्ये त्यांनी केलेल्या कामाची पोचपावती म्हणूनच सहकार पॅनलच्या माध्यमातून अभ्यासू व्यक्तीमत्व असलेल्या सौ. स्नेहल सचिन बाईत यांची रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समिती या संस्थेच्या उपसभापती पदी निवड झाली आहे. हि आबलोली गावासाठी आणि गुहागर तालुक्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. Agriculture Produce Market Committee Deputy Chairman Snehal Bait