• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
21 May 2025, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

सैनिक मुला-मुलींच्या वसतिगृहामध्ये प्रवेश

by Manoj Bavdhankar
May 17, 2024
in Ratnagiri
107 1
0
210
SHARES
600
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख १५ जून

रत्नागिरी, दि.17 : जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या अधिपत्याखालील सैनिकी मुला-मुलींच्या वसतिगृहामध्ये सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षाकरिता प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात येत आहे. प्रवेश पुस्तिकांची विक्री सुरु करण्यात आली असून, प्रवेश अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख १५ जून आहे. Admission to Soldier Hostel

यामध्ये सर्व युद्ध विधवा / इतर माजी सैनिक विधवा / माजी सैनिक व त्यांची अनाथ पाल्ये यांनी याचा फायदा घ्यावा. शिल्लक राहिलेल्या जागा सामान्य विद्यार्थ्यांना देण्यात येतील. प्रवेश अर्ज संबंधित वसतिगृहात उपलब्ध करण्यात आलेले आहेत, अशी माहिती जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी दिली. वसतिगृहामध्ये विद्यार्थी क्षमता – चिपळूण सैनिकी मुलांचे वसतिगृह- ४०, सैनिकी मुलीचे वसतिगृह- क्षमता ४० आहे. प्रवेश फी चे दर प्रतिमहा सेवारत सैनिक – भोजन, निवास व सेवाकरासह- अधिकारी – रु. ३,५००/-, जे.सी.ओ. रु.३,०००/- शिपाई/ एनसीओ ज- रु.२,८००/- असे आहेत. माजी सैनिक- भोजन, निवास व सेवाकरासह- (सवलतीचे दर) अधिकारी व ऑननरी रैंक – रु.३,०००/-, जे.सी.ओ.- रु. २,८००/-, शिपाई / एनसीओज- रु.२,५००/- असे आहेत. युद्ध विधवा, माजी सैनिक विधवा व माजी सैनिक अनाथ पाल्य यांना निःशुल्क आहे. सिव्हिलियन- भोजन, निवास व सेवाकरासह (पूर्णदर)- रु. ३,५००/- प्रवेश फी व्यतिरिक्त अनामत रक्कम रु. १,०००/- आकारण्यात येईल. Admission to Soldier Hostel

वसतिगृह प्रवेशासाठी युध्द विधवा / माजी सैनिकांच्या विधवांची सर्व पाल्ये व माजी सैनिकांची अनाथ पाल्ये, पदव्युत्तर (व्यावसायिक, वैद्यकीय, अभियांत्रिकी, व्यावसायिक पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमात शिक्षण घेणारी पाल्ये, बी. एड. डी. एड, पदवी अभ्यासक्रम (गुणवत्ता यादीप्रमाणे),१२ वी, ११ वी व १० वी या क्रमाने (गुणवत्ता यादीप्रमाणे) माजी सैनिकांचे दुसरे व तिसरे पाल्य, सेवारत सैनिकांचे पाल्य असा प्राधान्य क्रम देण्यात आला आहे. तरी  अधिक माहितीसाठी सैनिकी मुलांचे वसतिगृह, चिपळूण-७३८७५५१३४५, सैनिकी मुलींचे वसतिगृह, चिपळूण- ८३९०६७५९०२ यावर संपर्क साधावा. Admission to Soldier Hostel

Tags: Admission to Soldier HostelGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share84SendTweet53
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.