गुहागर, ता. 14 : उद्या दिनांक 15 रोजी महिला व बाल कल्याण मंत्री अदिती तटकरे गुहागर दौऱ्यावर येणार आहेत. शुक्रवार दिनांक १५ रोजी दुपारी ३ वाजता श्री. पुजा हॉल पाटपन्हाळे येथे महिला व बाल कल्याण विभागांतर्गत विविध योजनांच्या लाभाचे वाटप कार्यक्रमास त्या उपस्थित राहणार आहेत. Aditi Tatkare in Guhagar
पंचायत समिती गुहागर अंतर्गत एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प गुहागर द्वारा महिला व बाल कल्याण विभागांतर्गत विविध योजनांच्या लाभाचे वाटप मा. नाम. कु. आदिती व सुनिल तटकरे मंत्री (महिला व बाल विकास ) महाराष्ट्र राज्य यांच्या शुभ हस्ते व मा. आमदार श्री. भास्करराव जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आला आहे. अशी माहीत बाल विकास प्रकल्प अधिकारी एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प गुहागर यांनी दिली. Aditi Tatkare in Guhagar