• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
21 May 2025, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

लेक लाडकी योजनेअंतर्गत पाच हजार मंजूर

by Manoj Bavdhankar
March 16, 2024
in Guhagar
140 2
0
Aditi Tatkare in Guhagar
275
SHARES
787
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे

गुहागर, ता. 16 : लेक लाडकी या योजनेअंतर्गत एक मुलगी व मुलगा असणाऱ्या मातांनाही पाच हजार देण्याचे मंजूर झाले आहे. अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्यासह त्यांच्या कुटुंबाची मोफत आरोग्य तपासणीचा लाभ मिळणार असल्याचे महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले. गुहागर पंचायत समिती एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्पातर्फे महिला व बालकल्याण विभाग अंतर्गत विविध योजनांच्या अनुषंगाने लाभाचे वाटप अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मंत्री अंदिती तटकरे यांच्याहस्ते पाटपन्हाळे येथील श्री पूजा सभागृहात करण्यात आले. Aditi Tatkare in Guhagar

यावेळी तटकरे यांनी निवृत्तीवेतन, एक लाखाचा विमा एक रकमी लाभ मिळणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच स्मार्ट मोबाईलबरोबर चार्जर, पाऊच कव्हर देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले. राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीचा लाभ मिळावा यासाठी मंत्रिमंडळापुढे प्रस्ताव ठेवण्यात आला असून लवकरच त्यावर निर्णय होईल, असे आश्वासीत केले. Aditi Tatkare in Guhagar

यावेळी गुहागर तालुक्यातील लेक लाडकी योजनेअंतर्गत पाच मंजूर लाभार्थ्यांना पहिल्या हप्त्याचा धनादेश अदिती तटकरे यांच्याहस्ते देण्यात आला. तसेच बालसंगोपन योजना लाभार्थी, सेवानिवृत्त, मयत, राजीनामा दिलेले अंगणवाडी सेविका/मदतनीस यांना एक रकमी एलआयसी लाभ मंजुरीचे धनादेश, एकूण ८ अंगणवाडी सेविकांना स्मार्ट मोबाईल वाटप, स्मार्ट सक्षम अंगणवाडीसाठी दोन अंगणवाडी सेविकांना साहित्य –सीसाँ वाटप, जिल्हा परिषद सेस २०२३-२४ अंतर्गत ३ ते ६ वयोगटातील बालके व स्तनदा, गरोदर माता यांना मायक्रोन्यूट्रीएंट सप्लीमेंट ग्रँन्यूएल्स, बेबीकेअर कीट आदींचे वाटप करण्यात आले. मिशन आपुलकी अंतर्गत उत्कृष्ट काम करणाऱ्या एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या एकूण १४ अंगणवाड्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. तसेच अंगणवाडी सेविका, मदतनीस,पर्यवेक्षिका यांना आदर्श पुरस्कार देऊन अदिती तटकरे यांच्याहस्ते गौरविण्यात आले. Aditi Tatkare in Guhagar

या कार्यक्रमाला गुहागर पंचायत समिती गटविकास अधिकारी तुकाराम जाधव, महिला बालकल्याण प्रकल्प अधिकारी प्रमोद केळस्कर, बाबाजी जाधव, सुरेश सावंत, दिशा दाभोळकर, साहिल आरेकर, सुजाता बागकर गुहागरचे माजी नगराध्यक्ष राजेश बेंडल, प्रदिप बेंडल यांच्यासह राष्ट्रवादीचे अन्य पदाधिकारी, पंचायत समितीचे महिला बालकल्याण विभागाचे अधिकारी, कर्मचारी व अंगणवाडी कर्मचारी उपस्थित होते. Aditi Tatkare in Guhagar

Tags: Aditi Tatkare in GuhagarGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share110SendTweet69
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.