रत्नागिरी, ता. 01 : येथील अदिती संदेश नागवेकर हिने सीए अंतिम परीक्षेत सुयश मिळवले. सीए फाउंडेशन व इंटरमिजीएट या परीक्षांसाठी अदितीने उज्ज्वला क्लासेसमध्ये पुरुषोत्तम पाध्ये यांच्याकडे शिक्षण घेत परीक्षांमध्ये यश मिळवले. त्यानंतर सीए अॅंथनी राजशेखर अॅंड कंपनी यांच्याकडे आर्टिकलशिप केली. अंतिम परीक्षेत पेन ड्राईव्ह क्लासेस व घरीच अभ्यास करून यश मिळवले. Aditi Nagvekar Success in CA Exam
अदितीचे प्राथमिक शिक्षण जीजीपीएसमध्ये झाले. अदितीने चौथीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत चौथा व सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत स्थान पटकावले होते. तसेच गणित प्रज्ञा, प्रावीण्य परीक्षेतही शिष्यवृत्ती मिळवली होती. दहावी व बारावीमध्ये ९५ टक्के गुण तिला होते. इयत्ता बारावीचे शिक्षण तिने अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयात घेतले. तर गोगटे-जोगळेकर महाविद्यालयातून बीकॉम पदवी परीक्षेत ९.९७ सीजीपीए मिळवले. याशिवाय ऑलिंपियाड, अॅबॅकस, टायपिंग, टॅली याही परीक्षेत यश मिळवले आहे. अदितीचे वडिल संदेश नागवेकर हे जयगडच्या आंग्रे पोर्टमध्ये डेप्युटी मॅनेजर (अकाउंट्स, फायनान्स) आणि आई सौ. प्रेरणा या एमआयडीसीमध्ये डेप्युटी इंजिनिअर म्हणून कार्यरत आहेत. या यशाबद्दल अदितीचे कौतुक करण्यात येत आहे. Aditi Nagvekar Success in CA Exam