गुहागर पोलिसांचे धाडसत्र सुरूच
गुहागर, ता. 23 : तालुक्यातील गावठी दारूधंदयावरील गुहागर पोलिसांचे धाडसत्र सुरूच असुन शुक्रवारी पिंपर व निगुंडळ याठिकाणी कारवाई करत दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. Action on liquor shops in Pimpar and Nigundal
गुहागर तालुक्यातील पिंपर चौसोपीवाडी गुरांच्या गोठ्याजवळ बिगर परवाना गावठी हातभट्टीची दारू विक्री करत असताना दयानंद बाबाजी गुरव, वय ४३ मिळून आल्यावर त्याच्याकडून ६०० रूपये किंमतीची १० लिटर गावठी दारू जप्त करण्यात आली आहे. याप्रकरणी दयानंद बाबाजी गुरव याच्यावर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५ (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस शिपाई सतीश कुंभार यांनी फिर्याद नोंदवीली आहे. Action on liquor shops in Pimpar and Nigundal
तसेच तालुक्यातील निगुंडळ गावाच्या सिमेलगत जंगलमय भागात गावठी दारू भट्टी उद्धवस्त केली आहे. त्याठिकाणी एकूण ६१०० रूपयाचे साहित्य, रसायन मिळुन आले असून याप्रकरणी बाळु रत्नु मुकनाक, वय ६५ राहणार निगुंडळ वरचीवाडी यांच्यावर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५ (फ ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी राजेश धनावडे यांनी फिर्याद दाखल केली आहे. Action on liquor shops in Pimpar and Nigundal