सलग १५ व्या वर्षीहि बिनविरोध निवड
संदेश कदम, आबलोली
गुहागर, ता. 31 : तालुक्यातील निर्मल ग्रामपंचायत आबलोलीची ग्रामसभा सरपंच सौ. वैष्णवी वैभव नेटके यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत कार्यालय आबलोली येथे नुकतीच उत्साहात संपन्न झाली. यावेळी तंटामुक्ती समिती निवडीचा विषय ग्रामसेवक श्री. बाबूराव सुर्यवंशी यानी सभेसमोर मांडला. यावेळी सुभाष काजरोळकर यांनी श्री. विद्याधर राजाराम कदम उर्फ आप्पा कदम यांच्या नावाची सलग १५ व्या वर्षी हि अविरोध निवडीची सूचना आणली या सूचनेला प्रमोद गोणबरे यांनी अनुमोदन दिले. Abaloli Tantamukti Samiti President Appa Kadam
विद्याधर राजाराम कदम ऊर्फ आप्पा कदम यांचे रक्तदान करण्यात फार मोठे योगदान असून त्यांनी आता पर्यंत अनेक महिला – पुरुषांना रक्तदान करून जिवदान दिले आहे. आप्पा कदम यांनी स्वातंत्र्यदिनी ६४ व्या वर्षात ९८ वेळा रक्तदान केलेले आहे आणि त्यांच्या वाढदिवशी ३० जानेवारी २०२५ रोजी आप्पा कदम यांनी रक्तदानाच्या शतक पूर्तीचा संकल्प केला आहे. आप्पा कदम यांना “आबलोली भूषण”, ” जिवनदाता”, “जिवन गौरव”असे अनेक पुरस्कार देऊन त्यांच्या रक्तदानाच्या पवित्र कार्याला प्रेस क्लब गुहागर, आप्पा कदम मित्र मंडळ, आनंदवन बुद्ध विहार मौजे आबलोली, मातोश्री लक्ष्मीबाई कदम स्मृती मंच खेरशेत, अशा अनेक संस्थांनी आप्पा कदम यांचा जाहीर सत्कार करून गौरविले आहे. आप्पा कदम यांनी गावातील तंटे गावातच मिटविण्यासाठी आजपर्यंत महत्वपूर्ण योगदान दिले असून ते दुसऱ्याच्या सुख – दु:खात धाऊन जातात सामाजिक काम करताना सर्वांना बरोबर घेऊनच गावाचा एकोपा अबाधित ठेवण्यात आप्पा कदम यांचा फार मोलाचा वाटा आहे. Abaloli Tantamukti Samiti President Appa Kadam
आप्पा कदम यांची सलग १५ व्या वर्षी तंटामुक्ती समीती आबलोलीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्या बद्दल सरपंच सौ. वैष्णवी वैभव नेटके, ग्रामसेवक बाबूराव सुर्यवंशी, उपसरपंच अक्षय पागडे, पोलीस पाटील महेश भाटकर, गाव प्रमुख यशवंत पागडे, अनंत पागडे, गावचे खोत सचिन कारेकर, ऍड.प्रमेय आर्यमाने, अविनाश कदम, माजी सैनिक अनंत पवार, माजी सरपंच महेंद्र कदम, विद्याधर कदम, सौ. वृषालीताई वैद्य, सौ.शैला पालशेतकर, सौ. पायल गोणबरे, सौ. पुजा कारेकर, श्रीमती. मोहिनी पांचाळ, संजय कदम, अमित करजकर, सुभाष काजरोळकर, प्रमोद गोणबरे, उमेश पवार, सुमित पवार, अनिकेत पागडे यांचेसह गाव प्रमुख, वाडी प्रमुख तसेच ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य या सर्वांनी विद्याधर राजाराम कदम उर्फ आप्पा कदम यांचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. Abaloli Tantamukti Samiti President Appa Kadam