• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
9 July 2025, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

कुडली (माटलवाडी) शाळेतील माजी शिक्षकांचा अनोखा उपक्रम

by Ganesh Dhanawade
February 19, 2025
in Guhagar
131 1
0
A unique initiative by former teachers
257
SHARES
734
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 19 : जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा कुडली नं. 03 (माटलवाडी) शाळेची डागडुजी जिंदाल कंपनीच्या सीएसआर फंडातून झाल्यानंतर शाळेमध्ये कमी असणाऱ्या वस्तूंची मागणी शाळेचे मुख्याध्यापक श्री.संदेश सावंत यांनी सर्व माजी शिक्षकांना कळवली. सर्व माजी शिक्षकांनी शाळेसाठी दिलेल्या योगदान ग्रामस्थांच्या आणि येणाऱ्या सर्व मंडळींच्या नजरेवर राहावे. यासाठी शाळेला वस्तुरूप देणगी देऊन आपल्या कार्याचा ठसा शाळेत कायम राहावा यासाठी या शाळेने राबवलेल्या उपक्रमाला सर्व माजी शिक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला.  A unique initiative by former teachers

A unique initiative by former teachers

या शाळेमध्ये कार्यरत असणारे माजी शिक्षक श्री. सिद्धार्थ जाधव व सौ.ममता जाधव यांनी 2000 रुपये, श्री. विष्णू गणपत आग्रे व डॉ. ओंकार आग्रे 5500 रुपये, श्री. संदीप तुकाराम सनगरे 2000 रुपये, श्री. भास्कर लक्ष्मण गावडे 2000 रुपये, श्री. निलेश दिनानाथ खामकर 2000 रुपये, श्री मगन गांगुर्डे 2000 रुपये, श्री.राम महाले 2000 रुपये, श्री. ज्ञानदेव मोरे 2000 रुपये,  श्री सुहास पोपट गायकवाड व सौ प्रमोदिनी सुहास गायकवाड यांस कडून स्टॅन्ड फॅन, श्री गणेश वायचाळ यांसकडून डायस भेट देण्यात आले. तसेच माजी शिक्षकांच्या रोख रक्कमेतून शाळेसाठी तीन कपाट चार फॅन, डायस अशी मोठी खरेदी करण्यात आली. A unique initiative by former teachers

यावेळी माटलवाडी युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. बबन माटल, माजी शिक्षकांचे प्रतिनिधी श्री. केशव आग्रे , शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री.राजेश वनये, कुडली ग्रामपंचायतचे माजी सरपंच श्री. शांताराम थोरसे, श्री.कृष्णा ठोंबरे, श्री संजय माटल, सौ.मनीषा गावणंग, महिला पालक, शाळेचे मुख्याध्यापक श्री. संदेश सावंत, पदवीधर शिक्षक श्री. गणेश पाडवी, उपशिक्षक श्री.महेश खारतोडे यांच्या उपस्थितीत फीत कापून शाळेला देणगी प्रदान करण्यात आली. सर्व ग्रामस्थांनी देणगीदारांचे खूप खूप आभार मानले. श्री संदेश सावंत यांनी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाचे सांगता केली. A unique initiative by former teachers

Tags: A unique initiative by former teachersGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share103SendTweet64
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.