बांग्लादेशी हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराचा करणार निषेध
गुहागर, ता. 07 : गुहागर तालुक्यातील समग्र हिंदू समाजाच्या वतीने मूक मोर्चाचे आयोजन केले आहे. बांग्लादेशातील हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ जागतिक मानवाधिकार दिनानिमित्त मंगळवार दिनांक 10 डिसेंबर 2024 या दिवशी सकाळी 10.30 ते 2 या वेळेत मूक मोर्चा तहसील गुहागर कार्यालयात दाखल होणार आहे. याबाबत निवेदन तहसील कार्यालय गुहागर येथे देण्यात आले आहे. A silent march to Guhagar on 10th December
सदर मूक मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज चौकातून निघेल. गुहागरच्या तहसील कार्यालयाजवळ मोर्चाची सांगता होईल. गुहागर तालुक्यातील जवळपास 500 ते 700 माणसे स्वयंप्रेरणेने या मोर्चात सहभागी होणार आहेत. सदर मुक मोर्चामध्ये कोणत्याही प्रकारचे शस्त्र, दंड किंवा अन्य आयुधांचा वापर करण्यात येणार नाही. तसेच वाहतुकीसाठी अडथळा होणार नाही याची काळजी घेतली जाईल. हा मूक मोर्चा तहसीलदार गुहागर कार्यालय येथे गेल्यावर उपस्थित पैकी प्रमुख पाच मान्यवर व्यक्तींचे शिष्टमंडळ तहसीलदार गुहागर यांना निवेदन देईल. त्यानंतर तहसील कार्यालयामागे असलेल्या पोलीस परेड मैदानावरती प्रमुख मार्गदर्शक छोट्या ध्वनी माध्यमांच्या सहाय्याने उपस्थितांना मार्गदर्शन करतील. उपस्थित पत्रकारांना याबाबतची माहिती दिल्यानंतर त्वरित कार्यक्रमाची सांगता करण्यात येईल. अशी माहिती विश्व हिंदू परिषदेचे कोकण प्रांत सहमंत्री अनिरुद्ध भावे यांनी दिली. A silent march to Guhagar on 10th December