गुहागरच्या टंचाई कृती आराखड्यात आली मागणी
गुहागर, ता. 05 : गुहागर पंचायत समिती सभागृहामध्ये संभाव्य पाणी टंचाई आढावा व सन २०२३-२४ टंचाई कृती आराखडा नियोजन बैठक आ. भास्कर जाधव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी टँकरसाठी रानवी, सुरळ, साखरी त्रिशुळ, पेवे, पोमेंडी, धोपावे, वेळंब येथील गावांनी मागणी केली आहे. गेल्यावर्षी ५ गावे ६ वाडयांना टँकरने पाणी पुरवठा करण्यात आला होता. A review of water scarcity in Guhagar
दरवर्षी तालुक्यात टंचाई कृती आराखडयातून उपाययोजना सुचवील्या जातात. वेगवेगळ्या योजनांच्या द्वारे पाणी टंचाई ग्रस्त गावांची संख्या कमी व्हावी. असा उद्देश असतो. परंतु पाण्याचा उद्भव आटल्याने गुहागर तालुक्यातील सुरळ, पोमेंडी, वेळंब, पेवे या गावांनी टँकरसाठी मागणी केली आहे. त्याचबरोबर रानवी, साखरी त्रिशुळ, धोपावे या गावांनाही वर्षानुवर्षे पाणी टंचाई आराखड्यात घ्यावे. अंजनवेल, वेलदूर आणि नवानगर या तिन गावातही पाणी टंचाई असते मात्र त्यांना कंपनीतर्फे पाणीपुरवठा केला जातो. A review of water scarcity in Guhagar


नव्याने टँकरची मागणी करणाऱ्या गावांचा आढावा आमदार जाधव यांनी घेतला. त्यावेळी सुरळ तसेच वेळंब येथील कुंभारवाडी, धावडेवाडी येथील पाणी योजनेच्या विहीरीतील उद्भव कमी झाल्याने समोर आले. रानवी व पेवे बौद्धवाडी येथील नळपाणी पुरवठा योजनेची दुरुस्ती आवश्यक आहे. साखरी त्रिशुळ गवळवाडीतील पाणी टंचाईची कायमची समस्या आहे. धोपावे येथील साडेनऊ कोटीची नळपाणी योजना जोपर्यंत कार्यान्वयीत होत नाही तोपर्यंत येथील समस्या कायम रहाणार आहे. ही कारणे समोर आली. त्यामुळे टंचाई कृती आराखड्याच्या बैठकीत योजनांची दुरुस्ती आणि पाण्याचा उद्भव शोधण्यासाठी भुजल सर्वेक्षण करण्याच्या सूचना आमदार जाधव यांनी दिल्या. A review of water scarcity in Guhagar