संदेश कदम, आबलोली
गुहागर, ता. 14 : तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक आदर्श शाळा खोडदे नं. १ येथे ३५ वा स्नेहसंमेलन सोहळा शाळेच्या भव्य पटांगणात उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलीत करून छत्रपती शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले, महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला प्रारंभ झाला. A friendly program was held in Khodde school
यावेळी सर्व पाहुण्यांचे पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. तसेच मुख्याध्यापक श्री. गौतम लोणारे, कुमारी पूजा गुरव, अंगणवाडी सेविका सौ. श्वेता गुरव, श्रीमती. प्राची साळवी, सौ.वैदही चव्हाण, सौ. मयुरा साळवी, त्यानंतर शाळेसाठी खुर्च्या दिलेल्या देणगीदारांचा, शाळेतील आजी-माजी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. शाळेमध्ये घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या व क्रमांक प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात आला. A friendly program was held in Khodde school
सभेच्या कार्यक्रमाचे नियोजनबद्ध सूत्रसंचालन शिक्षणतज्ञ श्री. विलास गुरव यांनी केले. शिक्षकांचे व विद्यार्थ्यांचे गुणगौरव करताना अध्यक्ष श्री.संदेश साळवी, श्री. सदानंद साळवी, श्री. विलास गुरव, ग्रामपंचायत सदस्य सौ. तनुजा पवार, पोलीस पाटील सौ. योगिता पवार, सौ. साक्षी सावंत, श्री.संतोष गुरव यांनी शाळेच्या गुणवत्तेबद्दल कमिटीचे, शिक्षकांचे व विद्यार्थ्यांचे, पालकांचे मनापासून कौतुक केले व आभार व्यक्त केले. अध्यक्ष संदेश साळवी यांनी सर्व पालक वर्गाचे, शिक्षकांचे, विद्यार्थ्यांचे व शालेय कमीटीचे आभार मानले. A friendly program was held in Khodde school
यावेळी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी श्री.संदेश साळवी, सौ.अपर्णा साळवी शिक्षण तज्ज्ञ श्री.विलास गुरव, सदानंद साळवी, उपसरपंच कु.पुजा गुरव, ग्रामपंचायत सदस्या सौ.तनुजा पवार, नाना साळवी, पोलिस पाटील सौ.योगिता पवार, सौ.साक्षी सावंत, श्री.संतोष गुरव, विनायक गुरव, हरिश्चंद्र साळवी,सौ.शर्वरी साळवी, सौ.सुषमा पांचाळ, सौ.अपूर्वा जाधव, सौ.संजना गुरव, श्रीमती.श्रध्दा साळवी, सुमित पवार, श्री.कोळी सर, श्री.उल्हास काळे, श्री.उदय साळवी, अनिल साळवी, मनोज साळवी, श्री.शामू साळवी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष व शाळा व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष श्री. संदेश साळवी यांच्या उपस्थितीत सभा व सत्कार समारंभ उत्साहात संपन्न झाला. A friendly program was held in Khodde school