शास्त्रज्ञही झाले थक्क
गुहागर, ता. 28 : ऑस्ट्रेलियातील म्युझियम व्हिक्टोरिया रिसर्च इन्स्टिट्यूटमधील शास्त्रज्ञांना तीक्ष्ण दात आणि सरड्यासारखा दिसणारा मासा सापडला आहे. ऑस्ट्रेलियाच्या दुर्गम कोकोस (कीलिंग) आयलँड्स मरीन पार्कच्या मोहिमेदरम्यान हा मासा सापडला आहे. A dangerous fish was found in the sea
या प्रदेशात पांढर्या वाळूचे किनारे आहेत. सरोवरांसह २७ लहान बेटांचा समावेश आहे. येथून तीन मैलांपेक्षा जास्त खोल समुद्रातून हे नमुने गोळा करण्यात आले आहेत. इतक्या खोल आढळलेल्या या अज्ञात प्राण्याचे भितीदायक दात आणि विचित्र डोळे पाहून संशोधकांना भुरळ पडलीय. येथे त्यांना एक सपाट मासाही सापडला आहे. डोळे त्याच्या डोक्याच्या दोन्ही बाजूला आहेत. खोल समुद्रातील बॅटफिश देखील सापडली आहे. जे आपल्या हाताच्या पंखांचा वापर करून समुद्रतळावर रेंगाळतात. त्याच्या चेहर्याचा आकार खूप भितीदायक असल्याने लोक आश्चर्यचकित झालेत. A dangerous fish was found in the sea
म्युझियम व्हिक्टोरिया रिसर्च इन्स्टिट्यूटमधील मोहिमेचे मुख्य शास्त्रज्ञ टिम ओ’हारा यांनी लाइव्ह सायन्सला सांगितले की, ‘हे मासे खोल समुद्रातील फॅशन स्टार्सपेक्षा कमी नाहीत.’ ते पुढे म्हणाले, ‘खोल समुद्रातील मासे सर्व आकारात येतात, ते हलके, पारदर्शक आणि मोठे डोळे असणारे असतात. प्रत्येक प्रजाती खोल समुद्राच्या वातावरणात अत्यंत अनुकूल आहे. आम्ही या सागरी उद्यानात राहणार्या नवीन प्रजातींची आश्चर्यकारक संख्या शोधली आहे.’ समुद्राच्या खोलवर अनेक असे जीव राहतात ज्यांचा शोध अजून लागलेला नाही. अनेक जीव अजूनही जगाला परिचित नाहीत. समुद्राच्या खोलीत अनेक असे जीव आहेत, ज्यांच्यापर्यंत सूर्यप्रकाश देखील पोहोचू शकत नाहीत. अशा वातावरणात ते राहतात. A dangerous fish was found in the sea