गुहागर, ता. 24 : तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सतत कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे खूपच नूकसान झाले आहे. आज सकाळी ७.३० च्या सुमारास बुधल घाटी याठिकाणी मुख्य रस्त्याच्या लगत असलेल्या महावितरणच्या विद्युत खांबावर दरड कोसळून संपूर्ण रस्त्यावर दरड, विद्युत खांब व तारा, झाडी, माती पसरल्याने या रस्त्यावरील वाहतूक पूर्णतः ठप्प झाली आहे. यामध्ये महावितरणाचे खूपच नुकसान झाले आहे. तसेच उमराठ खुर्द येथील मोहन आंबेकर यांच्या घराजवळ रस्त्यावर फणसाचे झाड पडले आहे. A crack fell on Budhal road
बुधल गावावरून वस्तीला असणारी शालेय विद्यार्थांना घेऊन जाणारी बुधल गुहागर एस.टी या मार्गावरून घटनेच्या काही मिनिटापूर्वी येथून मार्गस्थ झाली होती. सुदैवाने घटनेच्या काही वेळा पूर्वी याठिकाणावरून ही बस सुटल्याने मोठी दुर्घटना टळली. सतत पडत असलेल्या अति मुसळधार पावसामुळे दरड कोसळून एक भला मोठा दगड रस्त्याच्या अगदी मधोमध येऊन थांबला आहे. यामध्ये कोणतीही जीवितहानी नाही मात्र महावितरणचे मोठे नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे. सदर दरड बाजूला करण्याचे काम सुरू आहे. A crack fell on Budhal road