मुंबई, ता. 16 : नजिकच्या काळात राज्यातील अनेक देवस्थांनमध्ये ड्रेस कोड लागू करण्यात आला आहे. आता अष्टविनायक गणपतींसह 5 मंदिर व्यवस्थापनांकडून पोशाखा साठीची नियमावली जाहीर करण्यात आली आहे. Dress code enforced in temples
अष्टविनायक गणपतींपैकी मोरगावचा मोरेश्वर, थेऊरचा चिंतामणी, सिद्धटेकचा सिद्धिविनायक यांसह चिंचवडचा मोरया गोसावी संजीवन मंदिर आणि खार नारंगी मंदिरातील दर्शनासाठी पोशाखाची नियमावली जाहीर करण्यात आली आहे. ही 5 मंदिरे ज्या ट्रस्टच्या अंतर्गत येतात, त्या चिंचवड देवस्थान ट्रस्टकडून ही वस्त्रसंहिता लागू करण्यात आली आहे. Dress code enforced in temples


पुरुषांनी पारंपरिक आणि सभ्य पोशाख परिधान करावा. शर्ट, टी-शर्ट आणि पूर्ण पँट किंवा धोतर, कुर्ता पायजमा असा मंदिराच्या पवित्रतेला साजेसा पोशाख परिधान करावा. तर महिलांनी साडी, सलवार कमीज, पंजाबी ड्रेस किंवा अन्य पारंपरिक पोशाख परिधान करावा. मंदिराच्या पावित्र्यास अनुकूल असलेले आणि आदरयुक्त वस्त्र परिधान करावे. कोणीही अति आधुनिक, अपारंपरिक, पारदर्शक, टोकदार, स्लीव्हलेस, फाटके, शरीरप्रदर्शन करणारे अथवा अनौपचारिक कपडे मंदिर प्रांगणात परिधान करू नये, असे मंदिराच्या व्यवस्थापनांकडून सांगण्यात आले आहे. मंदिर प्रशासनाने या ड्रेस कोड नियमांसंदर्भात स्पष्टीकरण दिले आहे. ही सक्ती नाही तर मंदिराचे पावित्र्य राखण्यासाठी तोकडे कपडे परिधान करुन दर्शनासाठी न येण्याची विनंती करण्यात आली असल्याचे म्हटले आहे. Dress code enforced in temples