माजी पोलिस पाटील व लोकशिक्षण मंडळाचे कोषाध्यक्ष रमाकांत (नाना) साळवी यांच्या जन्मदिनानिमित्त
संदेश कदम, आबलोली
गुहागर, ता. 09 : तालुक्यातील खोडदे गावचे माजी पोलिस पाटील आणि लोकशिक्षण मंडळ आबलोली या शैक्षणिक संस्थेचे कोषाध्यक्ष रमाकांत (नाना) विष्णू साळवी यांचा जन्मदिन सोहळा त्यांच्या निवासस्थानी साजरा करण्यात आला. Distribution of educational materials to students

रमाकांत साळवी मित्र मंडळ, साळवी परिवार, आप्तेष्ट आणि श्री गजानन होतकरु संघ खोडदे देऊळवाडी यांनी या विविध स्तुत्य उपक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी चंद्रकांत बाईत माध्यमिक विद्यालय आबलोली या विद्यालयातील इयत्ता ५ वी ते १० वी मधील गरीब, गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी श्री. रमाकांत (नाना) विष्णू साळवी यांचे चिरंजीव श्री. राकेश साळवी, मुख्याध्यापक श्री. डि.डी.गिरी यांचेसह शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते. Distribution of educational materials to students