• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
24 October 2025, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

शरदचंद्रजी पवार कृषी महाविद्यालयात आळंबी उत्पादन

by Guhagar News
April 2, 2025
in Ratnagiri
165 2
0
Alambi production at Sharadchandraji Pawar Agricultural College
324
SHARES
926
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

 आळंबी उत्पादन कोकणासाठी रोजगार निर्मितीचे साधन

संदेश कदम, आबलोली
गुहागर, ता. 02 : चिपळूण तालुक्यातील खरवते – दहिवली येथील शरदचंद्रजी पवार कृषी महाविद्यालय या महाविद्यालयातील चतुर्थ वर्षातील विद्यार्थ्यांकडून व्यावसायिक दृष्टिकोनातून आळंबी उत्पादन घेण्यात आले आहे. आळंबी उत्पादन कोकणासाठी रोजगार निर्मितीचे साधन ठरेल असा विश्वास या विद्यार्थांचा आहे. अनुभवात्मक शिक्षण कार्यक्रमाअंतर्गत हा प्रकल्प या विद्यार्थ्यांकडून राबविण्यात आला आहे. Alambi production at Sharadchandraji Pawar Agricultural College

Alambi production at Sharadchandraji Pawar Agricultural College

कोकणामध्ये कृषि पुरक व्यवसायांची व्याप्ती वाढली पाहीजे. उद्योगशील तरुण वर्ग, महिला स्वयं सहाय्यता गट, बचत गट यांनी पुढाकार घेवुन कमी श्रम व  खर्चामध्ये, उपलब्ध संसाधनांचा पुरेपुर वापर करुन हा व्यवसाय करत भरघोस उत्पादन घ्यावे या समुपदेशक उद्देश उराशी बाळगुन या विद्यार्थ्यांकडून आळंबीच्या विविध जातींचे महाविद्यालयाच्या प्रक्षेत्रावरील प्रयोग शाळेतून उत्पादन घेण्यास सुरुवात केली आहे. 25×15 आकाराच्या दोन बंदिस्त खोल्यांमधुन हा  प्रकल्प साकारण्यात आला आहे. Alambi production at Sharadchandraji Pawar Agricultural College

Alambi production at Sharadchandraji Pawar Agricultural College

यामध्ये सेंद्रिय व रासायनिक अश्या दोन्ही पद्धती वापरुन चार पद्धतीच्या आळंबीचे उत्पादन करत योग्य नियोजन व व्यवस्थापन केल्यास कमीत कमी संसाधनांमध्ये हा प्रकल्प उत्तम रोजगाराचे साधन ठरेल हे सिद्ध केले आहे. या विद्यार्थ्यांकडून  आळंबीच्या प्युरटेस फ्लोरिडा, ब्लु आॅईस्टर, प्युरटेस साजर कॅजु व पिंक मशरूम्स आदी. जातीचे  सुमारे 60 कीलो उत्पादन घेण्यात आले आहे. सध्यस्थितीमध्ये आळंबीचा बाजारभाव हा प्रती कीलो पाचशे रूपये असुन या विद्यार्थ्यांना या प्रकल्पामधुन प्रचंड नफा होताना दिसत आहे. तसेच चिपळूण परीसरातील हाॅटेल मध्ये या विद्यार्थ्यांकडून उत्पादित करण्यात आलेल्या आळंबीला मोठी मागणी आहे. या उत्पादनासाठी लागणारा प्रमुख घटक म्हणजे स्पाॅन या विद्यार्थ्यानी पुणे येथील कृषि महाविद्यालयामधुन मागवले असुन भविष्यामध्ये शरदचंद्रजी पवार कृषी महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेतूनच हे स्पाॅन कसे तयार होतील या साठी प्रयत्नशील आहेत. Alambi production at Sharadchandraji Pawar Agricultural College

सदर विद्यार्थ्यांकडून उत्पादित झालेल्या आळंबी वर प्रक्रीया करत त्या पासुन  बिस्किट, लोणचे, पावडर आदी. पदार्थ बनविण्यात आले असुन याची यशस्वी विक्री देखील करण्यात आली आहे. सह्याद्रि शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष व चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार शेखरजी निकम व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुनितकुमार पाटील यांनी या प्रकल्पास भेट देवुन मार्गदर्शन केले व विद्यार्थ्यांकडून करण्यात आलेल्या कामाचे कौतुक केले. हा प्रकल्प यशस्वी करण्यासाठी संबंधित विद्यार्थ्यांना प्रकल्प अधिकारी प्रा. संग्राम ढेरे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. Alambi production at Sharadchandraji Pawar Agricultural College

Tags: Alambi production at Sharadchandraji Pawar Agricultural CollegeGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share130SendTweet81
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.