• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
10 May 2025, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

बातम्यांना त्वरित प्रतिसाद देण्यासाठी परिपत्रक जारी

by Manoj Bavdhankar
March 29, 2025
in Maharashtra
93 1
0
Maharashtra Government issues important circular
183
SHARES
522
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

माहिती व जनसंपर्क प्रधान सचिव ब्रिजेश सिंह यांची माहिती

मुंबई, ता. 29 : नागरिकांच्या तक्रारी आणि सार्वजनिक समस्यांविषयी विविध माध्यमांमधून प्रसिद्ध होणाऱ्या बातम्यांना त्वरित प्रतिसाद देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने महत्त्वपूर्ण परिपत्रक जारी केले आहे. या परिपत्रकाद्वारे विविध माध्यमातून प्रसिद्ध होणाऱ्या शासनविषयीच्या  महत्त्वपूर्ण  बातम्यांची दखल घेऊन त्याद्वारे शासनाची कार्यक्षमता वाढवून नागरिकांना अधिक चांगल्या सेवा देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे, अशी माहिती माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव आणि महासंचालक श्री. ब्रिजेश सिंह यांनी दिली. Maharashtra Government issues important circular

माध्यमांमधून प्रसिद्ध होणाऱ्या विविध बातम्यांची शासकीय विभागांकडून तात्काळ दखल घेण्यात येणार आहे. यामुळे नागरिकांच्या तक्रारी, समस्यांच्या  निराकरणासाठी मदत होणार आहे. कार्यक्षम सेवा, वितरण यंत्रणा, समस्यांचे जलद निराकरण करणे याकरिता माध्यमांमधून प्रसिद्ध होणारी  माहिती तथा बातम्यांची महत्त्वपूर्ण मदत घेता येणार आहे.  परिपत्रकाचा प्रमुख उद्देश माध्यमांशी संवाद वाढविणे, नागरिक-शासन दुवा मजबूत करणे,  पारदर्शक संवाद प्रक्रिया राबविणे, नियमित माहितीची  देवाण-घेवाण करणे आहे.  Maharashtra Government issues important circular

कार्यपद्धती

* प्रत्येक विभागात नोडल अधिकाऱ्याची  नियुक्ती
* बातम्यांची त्वरित दखल
* साप्ताहिक कृती अहवाल
* मासिक पुनर्विलोकन बैठका

अपेक्षित परिणाम:

* बातम्यांची त्वरित दखल घेऊन जलद तक्रार निवारण
* नागरिकांच्या समाधानात वाढ
* प्रशासकीय कार्यक्षमता वृद्धी
* सुशासन, प्रतिमा बळकटीकरण

“हे परिपत्रक म्हणजे पारदर्शक आणि जबाबदार प्रशासनाच्या दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल आहे.  यामुळे माध्यमांमधून प्रसिद्ध होणारी  माहिती आणि बातम्यांची दखल घेऊन त्याद्वारे  नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी अधिक प्रभावी यंत्रणा कार्यान्वित होईल, असे श्री. सिंह यांनी सांगितले. Maharashtra Government issues important circular

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMaharashtra Government issues important circularMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share73SendTweet46
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.