गुहागर, ता. 12 : तालुक्यातील निवोशी भेलेवाडी येथील ग्रामदेवता श्री जाखमाता देवीच्या नमन खेळ्यांची परंपरा अनेक पिढ्या जोपासत आहेत. या नमन खेळ्यातून प्राप्त उत्पन्नातून ग्रामविकासावर भर दिला जात आहे. Khele of Jakhamata Devi at Nivoshi Bhelewadi
निवोशी गावातील श्री जाखमाता देवी देवस्थान यांच्यावतीने ही भोवनीच्या खेळ्यांची परंपरा अनेक वर्षानंतरही जपली जात आहे. ही नमन मंडळी फाग पंचमीच्या तिसऱ्या दिवशी गावभोवनीसाठी बाहेर पडतात. यामध्ये नकटा व गोमू यांचा समावेश असतो. नकटा हा शंकराचा अवतार असल्याचे सांगितले जाते. नमन मंडळी अनवाणी भोवनीसाठी फिरत असतात. यामध्ये ग्रामदेवतेची बहीण असणाऱ्या श्री हसलाई देवीच्या गावात अर्थात वरवेलीत व दुसरी बहीण असणाऱ्या श्री झोलाई देवी अर्थात पालशेत गावात ही नमन मंडळी भोवनीसाठी फिरत असतात. यामध्ये गावातील ३५ हून अधिक लोकांचा सहभाग असतो. Khele of Jakhamata Devi at Nivoshi Bhelewadi


नमन खेळ्यांतून मिळालेले उत्पन्न ग्रामदेवतेच्या मंदिरासाठी निधी, सोयी सुविधा, मंदिराचे बांधकाम तसेच मारुती मंदिर, सभागृह, देवीची सहान, देवीचे चांदीचे रुपे तसेच गावातील इतर विकासासाठी खर्ची करण्यात येतात. नमन मंडळी भोवनीची सुरुवात निवोशी ग्रामदेवता श्री जाखमाता देवीच्या मंदिरात मृदुगाची थाप मारून म्हणजेच तिचा आशीर्वाद घेऊन नमन खेळे गाव भोवनीला बाहेर पडतात. प्रथम श्री जाखमाता देवीची बहीण वरवेलीतील श्री हसलाई देवी असल्याने याच गावातून करण्यात येते. दुसरी बहीण पालशेत गावाची ग्रामदेवता श्री झोलाई देवीला भेट देऊन तिचा आशीर्वाद घेतला जातो. त्यानंतर वेळंब , शृंगारतळी बाजारपेठ येथे भोवनीसाठी जात असतात. निवोशी येथील श्री जाखमाता देवीची स्थापना शेकडो वर्षांपूर्वी करण्यात आली. तेव्हापासून नमन खेळेमंडळी गावभोवनीसाठी बाहेर पडत असतात. या नमन खेळ्यांमध्ये देवस्थान अध्यक्ष, पदाधिकारी यांच्यासह ग्रामस्थही सहभागी होतात. शेवटी होळीच्या आदल्या दिवशी वाजत गाजत नमन खेळे निवोशी गावी परततात. Khele of Jakhamata Devi at Nivoshi Bhelewadi