इच्छुकांची फिल्डिंग; कुणाची वर्णी लागणार? पाहणे महत्वाचे ठरणार
मुंबई, ता. 04 : विधानसभा निवडणुकांनंतर रिक्त झालेल्या विधानपरिषदेच्या पाच जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. भाजपच्या तीन, राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या एक आणि शिवसेना शिंदे गटाच्या एका आमदारासाठी ही निवडणूक होणार आहे. या विधानपरिषदेच्या रिक्त जागांवर आता कोणाची वर्णी लागणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. Elections announced for 5 Legislative Council seats
विधानपरिषदेच्या पाच रिक्त जागांसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. 27 मार्च रोजी विधानपरिषदेसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार असून त्यासाठीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. महायुतीमधील भाजपचे 3, राष्ट्रवादी काँग्रेसचे 1 आणि शिवसेना शिंदे गटाची एक जागा रिक्त आहे. या रिक्त जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत विधानपरिषदेवर असलेले भाजपचे आमदार, प्रवीण दटके, गोपीचंद पडळकर आणि रमेश कराड यांच्यासह शिवसेनेकडून आमशा पाडवी आणि अजित पवार गटाकडून राजेश विटेकर यांच्या जागा रिक्त झाल्या आहेत. या रिक्त जागांसाठी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून कुणाची लॉटरी लागणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. Elections announced for 5 Legislative Council seats


या निवडणुकीमुळे पाच नवीन कार्यकर्त्यांना आमदार होण्याची संधी प्राप्त झाली असून त्यातील तीन भाजपाचे एक एक आमदार शिंदे आणि अजित दादा गटाचे असतील. महायुती झाल्यानंतर अनेक ठिकाणी बंडखोरी टाळावी यासाठी काहींना विधान परिषदेवर पाठवण्याचे आश्वासन दिले गेले आता त्यात अनेक इच्छुक आहेत यामुळे नेमकी कोणाला संधी मिळते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, या जागांवर मतदान झाल्यास निवडून येण्यासाठी 57 मतांचा कोटा लागेल सध्या परिस्थितीत विरोधी काँग्रेस शिवसेना आणि शरद पवार यांचा गट यांच्या तिघांची एकत्रित बेरीज केली तरीही 57 मत होत नसल्याने त्यांचा एकही उमेदवार निवडून येण्याची शक्यता नाही त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे. ज्या पक्षाचा जो आमदार विधान परिषदेमधून विधानसभेत गेला ती जागा त्या पक्षाला दिली जाण्याची शक्यता आहे. Elections announced for 5 Legislative Council seats