शृंगारतळी येथे राजलक्ष्मी चित्रमंदिर येथे “छावा” चित्रपट प्रदर्शित न केल्यास मनसे आक्रमक पावित्रा घेणार
गुहागर, ता. 25 : तालुक्यातील शृंगारतळी येथील राजलक्ष्मी चित्रमंदिर येथे “छावा” चित्रपट येत्या पाच दिवसात संबंधित मालकाने प्रदर्शित न केल्यास गुहागर तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक पावित्रा घेणार असल्याचे निवेदन गुहागर तहसीलदार परीक्षित पाटील यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर यांनी दिले आहे. MNS statement to Guhagar Tehsildar


या निवेदनात म्हटले आहे की, शृंगारतळी येथील वेळंब रोड येथे राजलक्ष्मी चित्रमंदिर आहे. परंतु मालकाच्या काही कारणास्तव ते सध्या बंद अवस्थेत आहे. गुहागर तालुक्यात एकच सुसज्ज करमणूक केंद्र म्हणून राजलक्ष्मी चित्रमंदिर आहे. परंतु हे चित्रमंदिर बंद असल्याने गुहागर तालुका वासियांना करमणुकीपासून वंचित राहावे लागत आहे. सध्या संपूर्ण भारत देशभर गाजत असलेला श्री छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित ‘छावा’ चित्रपट सर्वत्र प्रदर्षित झाला आहे. परंतु या चित्रपटाचा लाभ गुहागर तालुका वासिय घेऊ शकत नाहीत. याबाबत राजलक्ष्मी चित्रमंदिर व्यवस्थापनाला विचारणा केली असता, सदर चित्रपट प्रदर्शित करण्यास मालकाने नकार दिला आहे. छावा चित्रपटांमध्ये चिपळूण तालुक्यातील बोरगाव येथील अभिनव साळुंखे हा छोटा कलाकार छत्रपती संभाजी राजे भोसले यांची बाल वयातील भूमिका आहे. हे आपल्या जिल्ह्याच्या दृष्टीने गौरवास्पद आहे. या बाल कलाकाराचा मनसेच्या वतीने सन्मान करण्याचं भाग्य ही आम्हाला लाभले आहे. सर्वत्र प्रदर्शित होत असलेला ‘छावा’ चित्रपटाचे काही शो मनसे गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांच्या सौजन्याने गुहागर वासियांसाठी मोफत लावण्याचे योजले आहे. याबाबत आम्ही व्यवस्थापनास याची माहिती दिली. तरीही चित्रपट प्रदर्शित करण्यास त्यांनी दुर्लक्ष केले आहे. येत्या पाच दिवसात राजलक्ष्मी चित्रमंदिर मध्ये ‘छावा’ चित्रपट राजलक्ष्मी चित्रमंदिरच्या मालकाने प्रदर्शित न केल्यास मनसे आक्रमक पवित्रा घेईल याची नोंद घ्यावी. MNS statement to Guhagar Tehsildar
यावेळी उपजिल्हा अध्यक्ष श्री विनोद गणेश जानवळकर, उपतालुका अध्यक्ष जितेंद्र साळवी, अमित खांडेकर, शहर अध्यक्ष नवनाथ साखरकर, विभाग अध्यक्ष प्रसाद विखारे, शहर सचिव अभिजित रायकर, प्रशांत साटले दत्ताराम गिजे महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते. MNS statement to Guhagar Tehsildar