गुहागर, ता. 24 : तालुक्यातील तवसाळ श्री महामाई सोनसाखळी देवी मंदिराचा कलशारोहण सोहळा शुक्रवार १४ ते १७ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत उत्साहात साजरा करण्यात आला. या सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते. Temple Kalasha Rohan ceremony at Tavasal


श्री महामाई सोनसाखळी देवीचा कलशारोहण सोहळ्यानिमित्त 14 फेब्रुवारी रोजी देवस्थानचे मानकरी राजेश रमेश सुर्वे यांचे घर ते महामाई मंदिर पर्यंत कलश मिरवणूक हजारो भक्तगणांच्या उपस्थितीत, सनई ढोल ताशा पारंपारिक वाद्यांच्या गजरामध्ये काढण्यात आली. रात्री स्थानिक भजनांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. 15 फेब्रुवारी रोजी शोडशोपचारे पूजन तसेच देवीला, रूपे लावण्याचा कार्यक्रम विधिवत करण्यात आला . सदर कार्यक्रमाला तालुक्यातील माहेरवाशीणी भक्तगण यांचा उस्फूर्त सहभाग लाभला होता. रात्री श्री भगवान लोकरे श्री दत्त प्रासादिक भजन मंडळ भांडुप व श्री प्रमोद हरियाण श्री पावणादेवी प्रासादिक मंडळ घालवली, तालुका देवगड या सुप्रसिद्ध भजन सम्राटांची डबलबारी कार्यक्रम आयोजित केला होता. तसेच देवस्थापना होम हवन, दुष्ट ओवाळणी व श्री सत्यनारायणाची महापूजा आयोजित करण्यात आली होती. रात्री तवसाळ पंचक्रोशीतील बहुरंगी नमन कार्यक्रम सादर करण्यात आला. Temple Kalasha Rohan ceremony at Tavasal


सदर कार्यक्रमामध्ये प्रेक्षकांचा उत्साह वाढत होता. श्री महामाई सोनसाखळी मंदिराचा कलशारोहण सोहळा कार्यक्रमाला हजारो भाविकांनी हजेरी लावून देवीचे दर्शन घेतले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अध्यक्ष, श्री मोहन गडदे सर्व पंच कमिटी व सर्व मान्यवर, ग्रामस्थ, पदाधिकारी यांनी मेहनत घेतली. सदर कार्यक्रमासाठी तवसाळ पंचक्रोशीतील मुंबई कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते. Temple Kalasha Rohan ceremony at Tavasal