गुहागर चिपळूण मार्गावरील कलिंगड विक्री केंद्राचे गट विकास अधिकारी भिलारे यांच्या हस्ते
गुहागर, ता. 05 : तालुक्यातील पाटपन्हाळे येथील तरूण प्रगतीशिल शेतकरी तेजस तुकाराम तेलगडे यांच्या गुहागर चिपळूण मार्गावरील कलिंगड विक्री केंद्राचे उद्घाटन पंचायत समिती, गुहागर चे गट विकास अधिकारी शेखर भिलारे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी तेजस तेलगडे यांचे कलिंगड विक्री केंद्र उभारल्याबद्दल कौतुक करून तेजस याचा आदर्श तालुक्यातील तरूण शेतक-यांनी घेऊन, अशाच प्रकारे अनेक तरुणांनी शेतात उत्पादित मालाची विक्री स्वतःच करण्याचे आवाहन वजा सल्ला पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शेखर भिलारे यांनी दिला. Inauguration of the watermelon sales center
यावेळी सहाय्यक गट विकास अधिकारी प्रमोद केळस्कर, कृषी विस्तार अधिकारी प्रतिक जाधव, माजी कृषी विस्तार अधिकारी गजेंद्र पौनीकर, ग्राम पंचायत विस्तार अधिकारी शरद भांड, ग्रामपंचायत पंचायत सदस्य पुजा पागडे, चंद्रकांत तेलगडे, ग्रामपंचायत अधिकारी श्रीम. सुलभा बडद, पाटपन्हाळे सोसायटी उपचेअरमेन रामचंद्र पागडे, शेतकरी तुकाराम तेलगडे, तेजस तेलगडे, गणपत पागडे, रूपेश तेलगडे, आदित्य तेलगडे, शांताराम तेलगडे हे उपस्थित होते. Inauguration of the watermelon sales center
तेजस तेलगडे या तरूणाने मुंबई ला जाण्याचा मार्ग न पत्करता वडील तुकाराम तेलगडे यांच्या पावलावर पाऊल ठेवून गेले 4-5 वर्ष आधुनिक पद्धतीने पाटपन्हाळे येथील शेतात कलिंगड व भाजीपाला लागवड करतात. वडील तुकाराम तेलगडे हे गेली 14-15 वर्ष कलिंगड लागवड करून हजारो रूपयांचे उत्पादन घेत होते. आता मुलगा तेजस याला कलिंगड उत्पादनाबरोबरच विक्री करण्याचे सुचविल्यानंतर तेजस यांनी हे विक्री केंद्र उभारून विक्रीला सुरूवात केली आहे. स्वतःच्या शेतात पिकलेल्या उत्पादनाची विक्री करण्यासाठी स्वतःच गुहागर चिपळूण मार्गावर पाटपन्हाळे येथे विक्री केंद्र उभारून गेले 4-5 वर्ष कलिंगड व इतर भाजीपाल्याची विक्री करतात. श्री.तेलगडे यांचे संपूर्ण कुटुंब या शेतीवर चांगल्याप्रकारे उदरनिर्वाह करीत आहेत. पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी शेखर भिलारे व सहायक गट विकास अधिकारी प्रमोद केळस्कर यांनी तेजस तेलगडे यांचं कौतुक केलं असून अशाच प्रकारे अनेक तरुणांनी शेतात उत्पादित मालाची विक्री स्वतःच करण्याच्या सल्लाही त्यांनी यावेळी दिला. Inauguration of the watermelon sales center