पाटपन्हाळे येथे कार्डसिद्धेश्वर भक्त सेवा मंडळाच्या वतीने आयोजन
गुहागर, ता. 03 : गुहागर तालुका मार्गताम्हणे व राजापूर परिसर कार्डसिद्धेश्वर भक्त सेवा मंडळाच्या वतीने गतवर्षीप्रमाणे आध्यात्मिक पीठ कणेरी कोल्हापूर येथील प. पु. श्री. अदृश्य कार्डसिद्धेश्वर स्वामीजी यांचा दर्शन व प्रवचन सोहळा आयोजित केला आहे. हा आध्यात्मिक सोहळा दि. 06 रोजी सांबसदाशिव सभागृह निळकंठेश्वर मंदिर, पाटपन्हाळे हायस्कूल पटांगण शृंगारतळी येथे आयोजित करण्यात आला आहे. तरी सर्व गुरुबंधू-भगिनींनी याचा लाभ घ्यावा. Spiritual ceremony at Patpanhale School


49 वे मठाधिपती कणेरी मठ यांचा कोल्हापूर यांचा आध्यात्मिक सोहळा दर्शन व प्रवचन कार्यक्रमानिमित्त गुरुवार दि. 6 रोजी सायंकाळी 4 ते 5 वाजता सांप्रदायिक भजन, सायंकाळी 5 ते 6 वाजता माउलींचे शुभागमन व दर्शन सोहळा, सायंकाळी 6 ते 7 वाजता नियोजित व्यक्तींचा सत्कार व निमंत्रित व्यक्तींचे विचार, रात्रौ 7 ते 9 वाजता प.पू. श्री अदृश्य कार्डसिद्धेश्वर स्वामीजींचे आध्यात्मिक प्रवचन व आरती, रात्रौ 9 ते 10 वाजता महाप्रसाद या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. Spiritual ceremony at Patpanhale School