मुंबई, ता. 31 : सध्या रात्रीच्या प्रारंभी आकाशात मंगळ, गुरू, शुक्र आणि शनी हे चार ग्रह अगदी साध्या डोळ्यांनी दिसत असल्याचे पंचांगकर्ते, खगोल अभ्यासक दा.कृ.सोमण यांनी सांगितले. याविषयी अधिक माहिती देताना श्री.दा.कृ.सोमण म्हणाले की, रात्रीच्या प्रारंभी पश्चिम आकाशात पूर्वा भाद्रपदा नक्षत्रात शुक्र-शनी दर्शन देतील. गुरू ग्रह रोहिणी नक्षत्रात मध्यआकाशात दिसेल तर पूर्व आकाशात पुनर्वसू नक्षत्रात लालसर रंगात मंगळ ग्रह दर्शन देईल. हे चार ग्रह साध्या डोळ्यानी सर्वांना पुढील काही दिवस रोज पाहता येतील. युरेनस आणि नेपच्यून साध्या डोळ्यानी दिसणार नाहीत. Sighting of four planets in the sky
खगोलप्रेमींसाठी चार ग्रह एकाचवेळी दिसण्याची ही पर्वणी आहे. तुमच्याजवळ जर दुर्बीण असेल तर शुक्राच्या कला, शनीची वलये आणि गुरू ग्रहाच्या पंचाण्णव चंद्रांपैकी चार चंद्र दुर्बीणीतून निरिक्षण करता येतील. सध्या अनेक शाळांतून आणि खगोल संस्थांमधून हे ग्रह दाखविले जात आहेत. त्यामुळे सर्व खगोलप्रेमी मोठ्या उत्साहात आकाश निरिक्षण कार्यक्रमात सहभागी होत आहेत. Sighting of four planets in the sky
सायंकाळी सूर्यास्तानंतर पश्चिम आकाशात शनिवार 1 फेब्रुवारी रोजी चंद्र-शनी युती दिसेल. रविवार 2 फेब्रुवारी रोजी चंद्र-शुक्र युती दिसेल. सोमवार 10 फेब्रुवारी रोजी चंद्र-मंगळ युती दिसेल, असे खगोल अभ्यासक पंचांगकर्ते दा.कृ.सोमण यांनी सांगितले. या पंचांगकर्ते सोमण यांचे व्याख्यान श्री. दा कृ सोमण हे वेळणेश्वर येथील महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयात 8 फेब्रुवारी 2025 रोजी संध्याकाळी 4:00 वाजता त्यांचे व्याख्यान आहे. Sighting of four planets in the sky