ज्ञानदीप सेवा मंडळ व माजी विद्यार्थी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन
संदेश कदम, आबलोली
गुहागर, ता. 24 : तालुक्यातील खोडदे मोहिते वाडी येथील ज्ञानदीप सेवा मंडळ आणि माजी विद्यार्थी यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दिनांक २५ जानेवारी २०२५ रोजी जिल्हा परिषद पुर्ण प्राथमिक शाळा खोडदे मोहिते वाडी या शाळेतील विद्यार्थांचा गुणगौरव सोहळा, वार्षिक स्नेह संमेलन आणि श्री. सत्यनारायणाची महापुजा या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. Mahapuja of Satyanarayana at Khodde


शनिवार दिनांक २५ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ११ वाजता श्री. सत्यनारायण महापुजा, दुपारी १:३० वाजता सर्वांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर सायंकाळी ४:०० वाजता महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ, रात्रौ ८:३० वाजता मुलांचा सांस्कृतिक कार्यक्रम, रात्रौ ९:३० वाजता मान्यवरांचे सत्कार त्यानंतर रात्रौ १०:३० अप नेक्स्ट प्रोडक्शन मुंबई यांची मराठी नाटिका “दृष्टी” तसेच देशभक्ती गाणी आणि नृत्य असा भरगच्च कार्यक्रम सादर होणार असून या संपूर्ण कार्यक्रमाला खोडदे पंचक्रोशीतील जनतेने वेळेत उपस्थित रहावे, असे जाहीर आवाहन ज्ञानदीप सेवा मंडळ मौजे खोडदे मोहिते वाडी या मंडळाचे मुंबईचे अध्यक्ष प्रशांत जनार्दन मोहिते, स्थानिक अध्यक्ष सदानंद तुलाजी मोहिते मुंबईचे सेक्रेटरी यशवंत जानू मोहिते, स्थानिक सेक्रेटरी नितिन केशव मोहिते, जेष्ठ मार्गदर्शक काशिनाथ गोविंद मोहिते, जनार्दन मोहिते, काशिराम मोहिते, कृष्णा कावणकर, शंकर तांबे, दत्ताराम धनावडे आदी कार्यकर्त्यांनी केले आहे. Mahapuja of Satyanarayana at Khodde

