असगोली विधाता संघ विजेता तर गुहागर महापुरुष संघ उपविजेता
गुहागर, ता. 20 : महापुरुष सांस्कृतिक कला व क्रीडा मंडळ आयोजित क्रिकेट स्पर्धेत प्रथम क्रमांक विधाता संघ, असगोली तर द्वितीय क्रमांक महापुरुष संघ गुहागर यांनी पटकावला. या स्पर्धा गुहागर पोलीस परेड मैदान येथे खेळविण्यात आल्या. Mahapurush Mandal cricket tournament
गुहागर महापुरुष सांस्कृतिक कला व क्रीडा मंडळ यांनी आयोजित केलेल्या क्रिकेट स्पर्धेत विजेत्या विधाता, असगोली संघास रोख रक्कम 15 हजार व आकर्षक चषक तर यजमान महापुरुष संघास रोख रक्कम 10 हजार व आकर्षक चषक देवून गौरविण्यात आले. या स्पर्धेत उत्कृष्ट फलंदाज म्हणून विधाता संघाचा कुंदन रोहिलकर, उत्कृष्ट गोलंदाज म्हणून महापुरुष संघाचा राकेश राऊत, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक रुपेश गावडे तर मॅन ऑफ द मॅच सिरीज विधाता संघाचा कुंदन रोहिलंकर हा मानकरी ठरला आहे. Mahapurush Mandal cricket tournament