• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
9 May 2025, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

पोलीस होण्याचं स्वप्न भंगलं

by Guhagar News
January 19, 2025
in Bharat
221 2
0
ST bus crushes youth in Beed
434
SHARES
1.2k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

सराव करताना एसटीनं ३ तरुणांना चिरडले

गुहागर, ता. 19 : पोलीस होण्याचं स्वप्न उराशी बाळगून तरूण दिवसरात्र सराव करतात. मात्र असाच पोलीस भरतीसाठी सराव करत असताना बीडमध्ये एसटी बसने तीन तरूणांना चिरडल्याची ह्रदयद्रावक घटना आज सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या अपघातात तीन तरूणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे. ST bus crushes youth in Beed

बीडच्या घोडका राजुरी फाट्यावरील आज सकाळी साडे सहाच्या सुमारास हा भीषण अपघात झालाय. पोलीस भरतीचा सराव करणाऱ्या ५ तरुणांना भरधाव वेगातील एस टी बसने चिरडले. या अपघातात तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला असून दोघांचा जीव वाचला. जखमींना जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलीस होण्याचं स्वप्न उराशी बाळगून तरूण पहाटे धावण्याचा सराव करतात. सकाळी रस्त्याच्या बाजूने तरूण धावत सराव करतात. बालाजी मोरे, ओम घोडके, आणि विराज घोडके अशी अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे तिघे पोलिस भरती करत होते. यासाठी रोज सकाळी ते बीड परळी मार्गावर व्यायाम करण्यासाठी एकत्र येत असे. आज सकाळी देखील हे तिघे मित्र व्यायाम करण्यासाठी बीड परळी मार्गावर एकत्र आले होते. यावेळी पाठीमागून आलेल्या भरधाव एसटीने त्यांना धडक दिली. यात तिघांचा जागीच मृत्यू झाला. ST bus crushes youth in Beed

मिळालेल्या माहितीनुसार आज रविवारी सकाळी बीड परळी महामार्गावर सकाळच्या सुमारास पोलीस भरतीची तयारी करण्यासाठी हे तीन तरुण व्यायाम करत होते. यावेळी मागून भरधाव वेगात येणाऱ्या एसटी बसने त्यांना धडक दिली. बसखाली सापडल्याने या तिघांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर तातडीने ग्रामस्थांनी या तिघांना दवाखान्यात भरती केलं. मात्र, डॉक्टरांनी त्यांचा मृत्यू झाल्याचं जाहीर केलं. पोलिस देखील घटनास्थळी दाखल झाले असून अपघात नेमका कसा झाला याच शोध पोलिस घेत आहे. हा अपघात बस सिमेंटच्या रस्त्यावरून खाली घसरून झाला असावा, अशी शक्यता वर्तवली जात आहे. ST bus crushes youth in Beed

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarST bus crushes youth in BeedUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share174SendTweet109
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.