• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
26 June 2025, Thursday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

लायन्स क्लबतर्फे गुहागर हायस्कूलच्या विद्यार्थांचा गौरव

by Ganesh Dhanawade
January 15, 2025
in Guhagar
169 1
4
Students honored by Lions Club

यशस्वी विद्यार्थ्यांना गौरविताना

331
SHARES
947
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 15 : लायन्स क्लब ऑफ गुहागर शहरातर्फे गुहागर तालुका, जिल्हा व विभागस्तरीय यश संपादन केलेल्या श्रीदेव गो.कृ. माध्यमिक विद्यामंदिर, सदानंद सुदाम पाटील विज्ञान श्री.महेश जनार्दन भोसले वाणिज्य व कै.विष्णूपंत पवार कला कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा नुकताच गौरव समारंभ संपन्न झाला. Students honored by Lions Club            

गुहागर तालुका मुख्याध्यापक संघातर्फे तालुकास्तरीय कथाकथन स्पर्धा व हस्ताक्षर – शुद्धलेखन स्पर्धांमध्ये गुहागर विद्यालयातील विद्यार्थांनी सहभाग नोंदवत उज्ज्वल सुयश संपादन केले. कथाकथन स्पर्धेत प्राथमिक गटात आर्या गणेश झगडे व माध्यमिक गटात स्वरा मंगेश पाटील यांनी सहभाग नोंदवला. या स्पर्धेत प्राथमिक गटात कु. आर्या गणेश झगडे या विद्यार्थिनीने तालुक्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला. सदर विद्यार्थिनीची जिल्हास्तरीय कथाकथन स्पर्धेसाठी निवड झाली आहे. हस्ताक्षर व शुद्धलेखन स्पर्धेत प्राथमिक गटात सौरभ संतोष जोगळेकर – ५ वी  याने तालुक्यात द्वितीय क्रमांक संपादन केला. माध्यमिक गटात  मधुरा संतोष पावसकर – १०वी  हिने उत्तेजनार्थ क्रमांकाचे सुयश संपादन केले. Students honored by Lions Club

हिंदी बालबोधिनी परीक्षेमध्ये सान्वी शैलेंद्र खातू ५वी – या विद्यार्थिनीने कोल्हापूर विभागात प्रथम क्रमांक प्राप्त केला. गुहागर तालुका विज्ञान प्रदर्शन निबंध स्पर्धेत कार्तिकी सुनील भोसले या विद्यार्थिनीने प्रथम क्रमांक संपादन केला. गुहागर तालुकास्तरीय गणित प्रश्नमंजुषा स्पर्धेत अनघा अभय साटले व मैत्रेयी मनोज शिंदे – १०वी या विद्यार्थिनींनी प्रथम क्रमांक पटकावला. अखिल भारतीय विज्ञान मेळावा तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत अनुष्का पंकज देवकर – ९वी या विद्यार्थिनीने उत्तेजनार्थ यश संपादन केले.  तसेच विज्ञान प्रदर्शनात अर्नी राधेश्याम घाडे – ६वी  या विद्यार्थिनीने बनवलेली विज्ञान प्रतिकृती कौतुकास पात्र ठरली. Students honored by Lions Club

विविध स्पर्धांमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा  लायन्स क्लब ऑफ गुहागर शहर यांच्यातर्फे मान्यवरांच्या हस्ते गुलाबपुष्प व भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला. गौरव समारंभासाठी लायन्स क्लब ऑफ गुहागर सीटीचे अध्यक्ष डॉ. अनिकेत गोळे, सचिव मनिष खरे, खजिनदार माधव ओक, शामकांत खातू , संतोष वरंडे, डॉ. मयुरेश बेंडल, स्व. सदानंद आरेकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष साहिल आरेकर, सौरभ भागडे, श्री सुरेश देवळेकर आदी उपस्थित होते. मुख्याध्यापक एस. एस. कांबळे यांनी उपस्थित मान्यवरांचे पुष्प देऊन स्वागत केले. उपमुख्याध्यापिका एस. एस. कांबळे यांनी कार्यकमाचे प्रास्ताविक केले. शिक्षक पी. बी जाधव यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. गौरव समारंभासाठी शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांचे सहकार्य लाभले. Students honored by Lions Club

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarStudents honored by Lions ClubUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share132SendTweet83
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.