गुहागर, ता. 11 : माध्यमिक विद्यामंदिर अँड ज्युनियर कॉलेज नाणिज रत्नागिरी येथे 52 वे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन दि. 8, 9 व 10 जानेवारी 2025 रोजी संपन्न झाले. या प्रदर्शनामध्ये प्राथमिक, माध्यमिक विद्यार्थी प्रतिकृती, शिक्षक शैक्षणिक साहित्य निर्मिती, परिचर प्रतिकृती, दिव्यांग प्रतिकृती अशा अनेक प्रतिकृती मांडल्या होत्या. Success of Dalwai High School in Science Exhibition
![](https://guhagarnews.com/wp-content/uploads/2025/01/adv-1-250x300.jpg)
![](https://guhagarnews.com/wp-content/uploads/2025/01/adv-1-250x300.jpg)
यामध्ये माध्यमिक शिक्षक शैक्षणिक साहित्य निर्मिती मध्ये दलवाई हायस्कूल मधील विज्ञान शिक्षिका सौ. रागिनी पराग आरेकर यांनी तृतीय क्रमांक प्राप्त केला. त्यांना यासाठी प्रशालेचे विज्ञान शिक्षक श्री. आघाव सर आणि कर्मचारी श्री. सुनील जाधव यांनी सहाय्य केले. त्यांच्या या यशासाठी मुख्याध्यापक श्री. रोहित जाधव सर, सर्व शिक्षकवृंद आणि संस्थाचालक यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. Success of Dalwai High School in Science Exhibition