गुहागर, ता. 10 : जिल्हा परिषद केंद्र शाळा नं.१ या शाळेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक उठावांतर्गत खेळाचे ५० पोशाख देणगी स्वरूपात प्राप्त झाले. या वर्षीच्या जिल्हा परिषद आयोजित हिवाळी क्रीडा स्पर्धेमध्ये शाळेने केंद्र, बीट, तालुका व जिल्हास्तरावर प्रशंसनीय यश प्राप्त केले. Donation of sportswear to Malan School
शाळेचे माजी विद्यार्थी श्री. वैभव गंगाराम बागवे यांनी वडील कै. गंगाराम भिकाजी बागवे गुरुजी यांच्या स्मरणार्थ २५ पोशाख देणगी दिले. तसेच शाळेचे सन १९९७/९८ या वर्षीचे माजी विद्यार्थी यांनी २५ पोशाख शाळेला देणगी दिले. श्री सत्यनारायण सन्मित्र मंडळ, मळण यांच्याकडून नोटिसबोर्ड देण्यात आला. गावचे सरपंच नारायण गुरव, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जितेंद्र पाटील, मळण येथील सेवाभावी कार्यकर्ते संतोष साळवी, पुनम साळवी, प्रमोद साळवी, ग्राम तंटामुक्ती समिती अध्यक्ष निलेश धामणस्कर तसेच गावातील वाडीप्रमुख यांच्या सहकार्याने क्रीडा स्पर्धेच्या वाहतूक व अन्य खर्चाच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यात आल्या. या सर्वांचे शाळेच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले. Donation of sportswear to Malan School