गुहागर, ता. 10 : तालुक्यातील विद्या प्रसारक मंडळ ठाणेचे महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालय, वेळणेश्वर महाविद्यालयाला राष्ट्रीय विद्यापीठाचे नॅक मानांकन मिळाले आहे. नवी दिल्ली येथील राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषद यांनी ०९ व १० डिसेंबर रोजी त्रिसदस्यीय समितीने या महाविद्यालयाचे सर्वेक्षण आणि मूल्यांकन केले होते. महाविद्यालयातील अभ्यासक्रम, अध्यापन, अध्ययन, परीक्षा मूल्यांकन, संशोधन, विस्तार कार्य, मूलभूत सुविधा व विद्यार्थी साह्य व प्रगती, प्रशासकीय नेतृत्व व व्यवस्थापन, संस्थात्मक मूल्य व नावीन्यपूर्ण उपक्रम आदींची पाहणी करून ‘नॅक’ समितीने ‘बी प्लस’ हा दर्जा बहाल केला आहे. NAC B Plus Rating for Velneshwar College
गुहागर तालुक्यातील एकमेव अभियांत्रिकी महाविद्यालय असलेल्या या महाविद्यालयात स्थापत्य अभियांत्रिकी, विद्युत अभियांत्रिकी, मेकॅनिकल अभियांत्रिकी, इंस्टूमेटेंशन अभियांत्रिकी, संगणक अभियांत्रिकी, इलेक्ट्रॉनिक्स व संगणक अभियांत्रिकी या सहा विभागांचा समावेश आहे. NAC B Plus Rating for Velneshwar College
महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालय स्थापनेपासून कमी कालावधीत नॅकचे ‘बी’ मानांकन प्राप्त करणारे मुंबई विद्यापीठातील एकमेव महाविद्यालय होते. यावेळी दुसऱ्या टप्प्यामध्ये राष्ट्रीय स्तरावरील नॅक ‘बी प्लस’ मानांकन मिळाले आहे, अशी माहिती राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषद यांनी जाहीर केली आहे. त्यामुळे गुहागर तालुक्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे शैक्षणिक संकुल विकसित करणाऱ्या विद्या प्रसारक मंडळाचे महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविदयालयात आनंदाचे वातावरण आहे. NAC B Plus Rating for Velneshwar College
नॅकचे मानांकन मिळविल्याबद्दल विद्या प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ.विजय बेडेकर यांनी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक व माजी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. सामुहिक परिश्रमाला योग्य न्याय मिळाल्याने महाविद्यालयाला नववर्षाची गोड भेट मिळाली आहे. यावेळी महाविद्यालय नॅक समिती समन्वयक म्हणुन डॉ. संतोष चतुर्भुज यांनी काम पाहिले. नॅकच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ नरेंद्रकुमार सोनी, उपप्राचार्य अविनाश पवार, सर्व विभागप्रमुख, शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी यांचे विशेष सहकार्य लाभले. NAC B Plus Rating for Velneshwar College
महाविद्यालयाला नॅक ‘बी प्लस’ मानांकन मिळाल्याने आमच्या संस्थेसाठी हा मोठा बहुमान आहे. त्यामुळे आता येथील शैक्षणिक गुणवत्ता आणि दर्जा कायम राखण्याची मोठी जबाबदारी आमच्यावर आली असून आणखीन आधुनिक करण्यासाठी प्रयत्न आणि योगदान देण्याची महत्वाची जबाबदारी आमच्यावर आहे. – डॉ.नरेंद्रकुमार सोनी- प्राचार्य NAC B Plus Rating for Velneshwar College