रत्नागिरी, ता. 08 : वाचन संकल्प महाराष्ट्राचा या महत्वाकांक्षी उपक्रमांतर्गत भारत शिक्षण मंडळाचे देव, घैसास, कीर वरीष्ठ महाविद्यालयाच्या ग्रंथालयात प्रेरणादायी ग्रंथ दिंडीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. वाचनप्रसार, ज्ञानवृद्धी, वाचनाची आवड निर्माण करणे आणि समाजामध्ये वाचन संस्कृती रुजवणे हा या ग्रंथदिंडीचा मुख्य उद्देश होता. Granth Dindi in Dev, Ghaisas, Keer College
महाराष्ट्रातील संत साहित्याच्या परंपरेतून प्रेरणा घेऊन राबवण्यात आलेल्या या उपक्रमाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. दिंडीच्या उद्घाटनप्रसंगी प्राचार्यांच्या हस्ते, भगवद्गीताग्रंथाचे पूजन करण्यात आले. विद्यार्थी आणि प्राध्यापक मोठ्या उत्साहाने या उपक्रमात सहभागी झाले होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाच्या प्राचार्या मधुरा पाटील, उपप्राचार्य वसुंधरा जाधव, ग्रंथालय समन्वयक सोनाली जोशी, राष्ट्रीय सेवा योजना विभाग व ग्रंथपाल साईप्रसाद पवार, विद्यार्थ्यांचे महत्त्वपूर्ण सहकार्य लाभले. Granth Dindi in Dev, Ghaisas, Keer College
विद्यार्थ्यांनी पुस्तक वाचा, जीवन घडवा अशा वाचन प्रेरणादायी घोषवाक्यांचा जयघोष करत परिसरात वाचन संस्कृतीची चळवळ उभारली. वाचनाची रुजवात आणि ज्ञानाची मशाल प्रज्वलित करणाऱ्या या उपक्रमामुळे वाचनसंस्कृतीला नवसंजीवनी मिळाली आहे, अशी भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली. Granth Dindi in Dev, Ghaisas, Keer College