गुहागर, ता. 04 : रिगल कॉलेज शृंगारतळी येथे दिनांक 4 जानेवारी 2025 रोजी वार्षिक क्रीडा महोत्सव संपन्न झाला. प्रथम पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती पूजन करण्यात आले. यानंतर रिगल कॉलेज शृंगारतळीचे हॉटेल मॅनेजमेंट विभागाचे विभागप्रमुख प्रा. श्री.बेर्डे सर यांच्या हस्ते मान्यवरांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. Sports Festival in Regal College Shringartali
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री. बी. जी. बागल (क्रीडा शिक्षक न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज तळवली), मा. श्री. प्रसन्ना वैद्य (चंद्रकांत बाईत विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, आबलोली), आणि मा. श्री. शोएब मालाणी (ओनर ऑफ मालाणी एम्पोरियम शृंगारतळी), मा.श्री.हुजैफा ठाकूर(सिकई मार्शल आर्ट आंतरराष्ट्रीय सुवर्णपदक विजेते) उपस्थित होते. Sports Festival in Regal College Shringartali
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना श्री. बी. जी. बागल यांनी सांगितले की, रिगल कॉलेज शृंगारतळी येथे पारंपारिक शिक्षण पद्धतीपेक्षा जास्तीत जास्त कौशल्यशिक्षणावर भर दिला जात असल्यामुळे विद्यार्थ्यांनी त्याचा फायदा घेऊन आपल्या कॉलेजचे नाव मोठे करावे. खेळ हे आत्ताच्या काळातील करिअर सेंटर असल्यामुळे विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबतच खेळाकडे सुद्धा करियर म्हणून रुची दाखवली पाहिजे. यानंतर श्री. प्रसन्ना वैद्य यांनी आपल्या मनोगतामध्ये विद्यार्थ्यांना खेळामुळे होणारे शारीरिक व मानसिक फायदे सांगितले. आपले शरीर ही आपली जबाबदारी आहे. तरी वेगवेगळ्या प्रकारचे खेळ व व्यायाम करून आपण आपले शरीर जपायचे आहे अशी विद्यार्थ्यांना त्यांनी सूचना केली. श्री.शोएब मालाणी यांनी विद्यार्थ्यांना खेळासाठी शुभेच्छा दिल्या. श्री. हुजैफा ठाकूर यांनी विद्यार्थ्यांना खेळ खिलाडूवृत्तीने खेळण्याचा सल्ला दिला तसेच खेळासाठी इन्फ्रास्ट्रक्चरपेक्षा सरावाची गरज असते हे देखील सांगितले. रिगल कॉलेज शृंगारतळीच्या प्राचार्या मा. सौ. मोरे यांनी रिगल कॉलेज शृंगारतळी येथे उपलब्ध असलेल्या सर्व व्यावसायिक कोर्सेस ची माहिती दिली तसेच सर्व विद्यार्थ्यांना क्रीडा महोत्सवासाठी शुभेच्छा दिल्या. Sports Festival in Regal College Shringartali
या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांसाठी क्रिकेट, डॉजबॉल, हॉलीबॉल, कबड्डी, रनिंग, थाळीफेक, गोळा फेक, खो-खो यांसारख्या विविध खेळांचा समावेश होता. कबड्डी मध्ये (मुली) प्रथम क्रमांक SYBCA, डॉजबॉल मध्ये प्रथम क्रमांक (मुली)TYBCA, क्रिकेटमध्ये प्रथम क्रमांक (मुली)TYBCA, खोखो मध्ये प्रथम क्रमांक (मुली)FYBCA. क्रिकेटमध्ये प्रथम क्रमांक (मुले) रिगल वॉरियर्स आणि व्हॉलीबॉल मध्ये प्रथम क्रमांक (मुले) रिगल स्ट्रायकर्स यांनी पटकावला. तसेच वैयक्तिक खेळांमध्ये धावणे (मुली) प्रथम क्रमांक सुविधा पवार, द्वितीय क्रमांक संजना पागडे, गोळाफेक (मुली) प्रथम क्रमांक जान्हवी गोयथळे, (मुले) प्रथम क्रमांक राहुल कनगुटकर, थाळीफेक (मुली) प्रथम क्रमांक जान्हवी गोयथळे, थाळीफेक (मुले)प्रथम क्रमांक पार्थ पावरी यांनी पटकावला. Sports Festival in Regal College Shringartali
या क्रीडा स्पर्धेचे नियोजन रिगल कॉलेज शृंगारतळीचे स्पोर्ट्स क्लब प्रमुख प्रा. श्री.विक्रम सर व प्रा.सौ पूजा मोरे मॅडम तसेच विद्यार्थी क्रीडा प्रमुख राहुल कनगुटकर व रिगलचे सर्व सहकारी प्राध्यापक वर्ग यांनी केले. वेळी रिगल कॉलेज शृंगारतळीचे सर्व विद्यार्थी तसेच प्राध्यापक वर्ग उपस्थित होते. रिगल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा. श्री.संजयराव शिर्के, संचालिका डॉ. सुमिता शिर्के व रिगल कॉलेज शृंगारतळीच्या प्राचार्या सौ. रेश्मा मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा संपन्न झाली. Sports Festival in Regal College Shringartali