गुहागर विजापूर महामार्गाची तात्काळ दुरुस्ती कराच; ठेकेदार कंपनीला पत्र
गुहागर, ता. 06 : विजापूर राष्ट्रीय महामार्गावरील गुहागर शहरापासून तीन किलोमीटरच्या रस्त्याला पडलेल्या खड्ड्यांबाबत मतदारसंघाचे आमदार श्री. भास्करराव जाधव यांनी दिलेल्या पत्राची तात्काळ दखल घेत राष्ट्रीय महामार्ग विभागाचे उपविभागीय अभियंता यांनी संबंधित ठेकेदाराला या मार्गावरील खड्डे ताबडतोब डांबराने बुजवावेत अशा स्वरूपाच्या सूचनांचे पत्र धाडले आहे. MLA Jadhav’s letter to the contractor company
गुहागर चिपळूण कराड राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 166 ई वरील किलोमीटर 0/00 ते 03/00 या महामार्गाच्या लांबीमध्ये मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून त्यामुळे नागरिकांना खूप त्रास होत आहे आणि वाहनधारक देखील त्रस्त झाले आहेत. गुहागर शहरापासून शृंगारतळीकडे जाणार 3 किलोमीटरचा हा रस्ता खड्ड्यांमुळे अस्तित्वात आहे की नाही, असा प्रश्न पडावा, इतकी वाईट अवस्था झाली असल्याने त्याची तात्काळ डागडुजी करावी, असे पत्र आमदार श्री. भास्करराव जाधव यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले होते. MLA Jadhav’s letter to the contractor company
यावर या विभागाचे उपअभियंता श्री. नाजीम मुल्ला यांनी या कामाचे ठेकेदार असलेल्या मे. मनीषा कन्स्ट्रक्शन कंपनी आणि राज कन्स्ट्रक्शन या कंपनीला पत्र पाठवून येत्या 2-3 दिवसांत खराब रस्त्याची डागडुजी डांबराने करून मंजूर निविदा अटी शर्तीनुसार व करारनामाप्रमाणे रस्ता सुस्थितीत ठेवावा, अशा सूचना दिल्या आहेत. हे काम तात्काळ सुरू न केल्यास खड्डे भरण्याचे हे काम कंपनीच्या जोखीम व खर्चातून करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी ठेकेदार कंपनीला दिला आहे. MLA Jadhav’s letter to the contractor company