गुहागर, ता. 04 : रत्नागिरी जिल्हा ग्रंथालय संघाचे 48 वे वार्षिक अधिवेशन शनिवार दि. 18 व रविवार दि. 19 जानेवारी 2025 रोजी घेण्यात येणार आहे. गुहागर तालुका सार्वजनिक ज्ञानरश्मि वाचनालयाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त रत्नागिरी जिल्हा ग्रंथालय संघाचे वार्षिक अधिवेशन गुहागरात होणार आहे. District Library Association Convention at Guhagar
ज्ञानरश्मि वाचनालय गुहागर यांच्या विद्यमाने श्रीपूजा सेवा मंगल कार्यालय, श्रीपूजा कृषी पर्यटन केंद्र, खातू मसाले उद्योगासमोर, पाटन्हाळे येथे हे अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघ वर्धा अध्यक्ष, डॉ. श्री गजानन कोटेवार यांचे अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आले आहे. तरी या अधिवेशनासाठी सर्व ग्रंथालय प्रतिनिधीनी उपस्थित रहावे, असे आवाहन वाचनालयाचे अध्यक्ष श्री राजेन्द्र आरेकर यांनी केले आहे. District Library Association Convention at Guhagar