रत्नागिरी, ता. 02 : भारत शिक्षण मंडळाचे देव, घैसास, कीर कला वाणिज्य आणि विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयाचे श्रमसंस्कार शिबिर दत्तक गाव उमरे येथे आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाला भारत शिक्षण मंडळाच्या कार्याध्यक्षा सौ. नमिता कीर, उपकार्याध्यक्ष चंद्रकांत घवाळी, उपकार्याध्यक्ष श्रीराम भावे, उमरे गावाचे सरपंच मंगेश निंबरे, उमरे गावचे ग्रामस्थ रवींद्र भाट्ये, शैलेश भाट्ये, बबन भातडे, ग्रामपंचायत सदस्य सौ. शर्वरी भाट्ये, महाविद्यालयाच्या प्र. प्राचार्या मधुरा पाटील, राष्ट्रीय सेवा योजना विभागप्रमुख प्रा. ऋतुजा भोवड, प्रा. विनय कलमकर, प्रा. वैभव कीर अन्य उपस्थित होते. Camp at Dev, Ghaisas, Kir College
कार्यक्रमाचे प्रास्ताविक एनएसएस कार्यक्रमाधिकारी ऋतुजा भोवड यांनी केले. प्रास्ताविकामध्ये शिबिरात झालेल्या उपक्रमाचा आढावा सांगितला. वनराई बंधारा, पाणवठयांची स्वच्छता, धार्मिक स्थळांची स्वच्छता, गांडूळखत निर्मिती, व्यक्तिमत्त्व विकास कार्यशाळा, पथनाट्य कार्यशाळा इ. कार्यक्रम यशस्वीपणे राबविण्यात आले. उमरे गावामध्ये श्रमसंस्कार निवासी शिबिरातून स्वयंसेवक यांनी लोकोपयोगी कामे केली, असे गावचे सरपंच मंगेश निंबरे यांनी सांगितले. स्वयंसेवकांनी या शिबिरामध्ये उत्फुर्त सहभाग घेतला असे मनोगत ग्रामस्थ श्री. शैलेश भाट्ये यांनी व्यक्त केले. Camp at Dev, Ghaisas, Kir College
या वेळी उपस्थित भारत शिक्षण मंडळच्या कार्याध्यक्षा नमिता कीर, उपकार्याध्यक्ष श्रीराम भावे, चंद्रकांत घवाळी, महाविद्यालयाच्या प्र. प्राचार्या मधुरा पाटील यांनी मगोगत व्यक्त केले. स्वयंसेवकांनी आपल्या मनोगताच्या माध्यमातून स्वतः ला चांगल्या सवयी लागल्या तसेच श्रमदानाचे महत्त्व समजून नेतृत्व गुण आणि संघभावना वाढीस लागल्याचे सांगितले. Camp at Dev, Ghaisas, Kir College
यावेळी उत्कृष्ट स्वयंसेवक – आयुष भायजे, उत्कृष्ट स्वयंसेविका – नेहा गोसावी, लक्षवेधी स्वयंसेवक – मयूर वांयगणकर, लक्षवेधी स्वयंसेविका – श्रावणी शिवलकर, उत्कृष्ट नेतृत्व – बसुराज मुलीमनी, उत्कृष्ट गट – क्रांती गट, उत्कृष्ट वेळेचे नियोजन – क्रांती गट, उत्कृष्ट एनएसएस उपक्रम – पथनाट्य योध्दा गट यांना गौरविण्यात आले. या वेळी प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार सहा. प्रा. मिथिला वाडेकर यांनी केले. Camp at Dev, Ghaisas, Kir College