गुहागर, ता. 26 : तालुक्यातील तवसाळ येथे दिनांक २०/२१ डिसेंबर २०२४ रोजी केंद्रीय क्रीडा स्पर्धा संपन्न झाल्या. या स्पर्धांमध्ये तवसाळ तांबडवाडी व बाबरवाडी शाळेतील मुलांनी घवघवीत यश संपादित केले. यावेळी मुख्याध्यापक अंकुर मोहिते, साईनाथ पुजारा सर, संदिप भोये सर, ज्ञानेश्वर कोकाटे सर, शाळा नियोजन कमेटी तवसाळ तांबडवाडी व बाबरवाडी मुंबई मंडळ वतीने सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन व पुढील स्पर्धेलासाठी शुभेच्छा दिल्या. Success of Tawasal School in sports competition

सांघिक क्रिडा प्रकार खोखो- मोठा गट मुली- विजेता, कब्बडी- लहान गट मुलगे – विजेता, कब्बडी – लहान गट मुली- उपविजेता, कब्बडी – मोठा गट मुली- उपविजेता , खोखो – लहान गट मुली- उपविजेता, लंगडी लहान गट मुली- उपविजेता, लंगडी मोठा गट मुली- उपविजेता

वयक्तीक क्रीडा प्रकार उंच उडी मोठा गट मुलगे – प्रथम क्रमांक विजेता कु. आरंभ विनोद वाघे, उंच उडी लहान गट मुलगे – प्रथम क्रमांक, कु हर्ष दिपक निवाते आणि स्पर्श विजय नाचरे द्वितीय क्रमांक, कु. हर्ष दिपक निवाते, धावणे – मुलगे ५० मिटर द्वितीय क्रमांक कु. हर्ष दिपक निवाते या सर्व विद्यार्थ्यांचे मनःपुर्वक अभिनंदन. Success of Tawasal School in sports competition
