महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या उत्पादनांचे 28 पासून प्रदर्शन व विक्री
गुहागर, ता. 26 : उमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान जिल्हा परिषद रत्नागिरी व पंचायत समिती गुहागर यांच्या वतीने ग्रामीण भागातील स्वयंसहाय्यता समुहातील महिलांनी उत्पादित केलेल्या उत्पादनांचे प्रदर्शन व विक्री गुहागर पोलीस परेड ग्राऊंडवर दि. २८ ते ३१ डिसेंबर या कालावधीत लोकसहभागातून सरस महोत्सव २०२४ चे आयोजन करण्यात आले आहे. या सरस महोत्सवामध्ये विविध कलात्मक वस्तु, कोकणी मसाले, कोकणी मेवा, कोकणी खाद्यसंस्कृती दालन इ. तसेच अस्सल ग्रामीण चवीचे खाद्यपदार्थाची मेजवानी असणार आहे. Saras Festival at Guhagar
शनिवार दि. २८ डिसेंबर २०२४ रोजी दुपारी ४ ते सायं. ७ वा. पर्यंत संगीत खुर्ची घेण्यात येणार आहे. प्रथम क्रमांक आकर्षक साडी व बटवा, व्दितीय क्रमांक साडी व तळमणी, तृतीय क्रमांकास साडी देण्यात येईल. संपर्क प्रमुख : सुनीता शेट्ये ९११९४०४७२६, स्मिता बागकर ७५०७४४९१८१, सुनिधी मोहिते ८३७८८३३०८९
रविवार दि. २९ डिसेंबर २०२४ रोजी सायं ७ ते सायं. १० वा. रेकॉर्ड डान्स स्पर्धा घेण्यात येणार आहेत. प्रथम क्रमांकास ५ हजार रुपये, तृतीय क्रमांक ३ हजार रुपये तृतीय क्रमांक १५०० रुपये पारितोषिक देण्यात येईल. संपर्क प्रमुख : रुपाली पवार ९४२१९०१६५३, ज्योती पालशेतकर ९४०४३२८०११. यासाठी नोंदणी फी रु. ३५० असणारं असून प्रथम ३० नोंदणी करणाऱ्यांना प्राधान्य राहील.
सोमवार दि. ३० डिसेंबर २०२४ रोजी सायं ५ ते सायं. ७ वा.फॅन्सी ड्रेस स्पर्धा घेण्यात येणार आहेत. प्रथम क्रमांक साडी व ट्रॉफी, द्वितीय क्रमांक घड्याळ व ट्रॉफी, तृतीय क्रमांक ड्रायर व ट्रॉफी. नियोजन प्रमुख : मिलन जाधव ९४०४८९९७५४, नेहा पवार – ८४६८९८०१२८ नोंदणी फी रु. ५० प्रति सदस्य, प्रथम ४० नोंदणी करणाऱ्यांना प्राधान्य राहील. केडर अभियानातील कोणतेही व्यक्ती सहभाग घेऊ शकेल. मंगळवार दि. ३१ डिसेंबर २०२४ रोजी सायं. ७ ते ८.३० वा. मंगळागौर, कोळी नृत्य, रात्रौ ९ वा. नमन, कोकणातील पारंपारिक सांस्कृतीक कार्यक्रम होणार आहेत. तरी यात सरस महोत्सवसाठी सर्वांनी भेट द्यावी, अशी विनंती उमेद – तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष पंचायत समिती, गुहागर यानी केले आहे. Saras Festival at Guhagar