गुहागर, ता. 16 : खेड गुणदे-देऊळवाडी येथे राजेश बेंडल यांच्या माध्यमातून पाण्याचा मोटार-पंप देण्यात आला होता. या पंपामुळे गुणदे-देऊळवाडीतील १८ घरातील पाण्याचा प्रश्न मिटला आहे. त्या निमित्ताने देऊळवाडी तील ग्रामस्थांनमार्फत राजेश बेंडल यांचे यथोचित सत्कार करून आभार मानण्यात आले. Water pump provided through Bendal
यावेळी ज्येष्ठ नेते परशुराम कारेते, ग्रामपंचायत सदस्य रत्नाकर कारेते, युवा नेते सागर संजय आंब्रे, शाखा प्रमुख अमोल यादव, कृष्णकांत जंगम, शशिकांत आंब्रे, राजाराम महाडिक, चंद्रकांत आंब्रे, जितेंद्र आंब्रे, विलास शिगवण, राजेश आंब्रे, रविंद्र दळवी, सुधाकर जंगम, केतन आंब्रे, दळवी, अरुण शिंदे, अरविंद धाडवे, मंथन आंब्रे, सनी शिगवण आदी उपस्थित होते. Water pump provided through Bendal