मस्य विभागाची माहिती, पडवे कामाचा येथे शुभारंभ
गुहागर, ता. 16 : मासेमारी करणारे मासेमारीसाठी खोल समुद्रात जात असतात. अनेकदा समुद्रात अचानकपणे आपत्कालीन परिस्थिती उद्भवते. त्यामुळे खोल समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या मासेमारांच्या सुरक्षिततेसाठी तात्काळ मदत मिळावी या उद्देशाने मासेमारी नौकांवर ट्रान्सपॉन्डर उपकरण बसविण्याच्या कामाचा शुभारंभ गुहागर येथील पडवे येथे करण्यात आला. Transponder device on boats in Guhagar
पडवे बंदरात साधारणपणे लहान मोठ्या 130 मासेमारी करणा-या परवाना धारक बोटी आहेत. यापैकी 6 सिलिंडरच्या बोटींवर ट्रान्सपॉन्डर हे उपकरण बसविण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. आपत्कालीन परिस्थितीत जसे कि, आग लागणे, नौकेचे इंजिन खराब झाल्यास, नौका समुद्रात बुडत असल्यास नौकांवर खलाशांना वैद्यकीय मदत लागल्यास या उपकरणाद्वारे संदेश पाठवता येतो. त्यामुळे मदत मिळण्यास सोपे होते. ट्रान्सपॉन्डर उपकरणामध्ये असलेले आपत्कालीन बटन हे थेट नियंत्रण कक्षाशी संपर्क करते. त्यामुळे नियंत्रण कक्षाला बोटीच्या समुद्रातील स्थळासह अलर्ट प्राप्त होतो. व त्यानुसार नौकेवरील नभमित्र अॅपव्दारे नियंत्रण कक्षाकडुन संदेश प्राप्त होतो. Transponder device on boats in Guhagar
प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेतंर्गत रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांतील सागरी मासेमारी नौकांसाठी आपत्कालीन परिस्थितीत मच्छीमारांना तातडीने मदतकार्य करता यावे, यासाठी ट्रान्सपॉंडर्स ही उपकरणे उपलब्ध झाले आहेत. नौकांचा ठावठिकाणा समजण्यासाठी हे उपकरण उपयुक्त ठरणार आहे. केंद्र सरकारकडून यापूर्वी सागरी मच्छीमारांसाठी व त्यांच्या कल्याणासाठी विविध योजना मंजूर आहेत. यापैकीच असणारी प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना आहे. विशेष करून कोकणातील मच्छीमारांना या योजनेचा मोठा फायदा झालेला आहे. मच्छीमारांच्या विविध मागण्या सोडविण्यासाठी केंद्र शासन नेहमीच प्रयत्नशील राहिले आहे. विशेष करून त्यांच्या सागरी सुरक्षेबाबत शासनाने मत्स्यसंपदा योजनेतून बरेच आर्थिक सहकार्य केले आहे. आता याच योजनेतून मच्छीमारांना ट्रान्सपॉडर हे उपकरण मोफत उपलब्ध झाले आहेत. पहिल्या टप्प्यात प्रत्येकी तीनशे ट्रान्सपॉंडर्स उपलब्ध झाले आहेत. Transponder device on boats in Guhagar
ट्रान्सपॉन्डर उपकरण बसविणे हे नौका मालक तसेच मासेमारी खलाशी यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहे. पडवे बंदरातील नौकांवर ट्रान्सपॉन्डर बसविण्याचे काम सुरू झाले आहे. गुहागर कार्यक्षेत्रातील नौकांवर बसविण्यासाठी 300 ट्रान्सपॉन्डर उपकरण उपलब्ध झाले आहेत. पडवे नंतर इतर बंदर निहाय नौकांवर ट्रान्सपॉन्डर उपकरण बसविण्याचे काम सुरू करण्यात येईल, सदर उपकरण बसविण्यासाठी मच्छिमार संस्था व नौका धारकांनी सहकार्य करावे, असे आवाहन गुहागर मत्स्यव्यवसाय विभागाचे परवाना अधिकारी स्वप्नील चव्हाण यांनी केले आहे. Transponder device on boats in Guhagar