संदेश कदम, आबलोली
गुहागर, ता. 13 : तालुक्यातील आंबेरे खुर्द येथील पांचाळवाडी येथे प्रतिवर्षी प्रमाणे श्री दत्त जयंती उत्सवाचे शुक्रवार दि. १३ ते रविवार दि. १५ रोजी आयोजन करण्यात आले आहे. तरी आंबेरे खुर्द पंचक्रोशीतील जनतेने वेळेत बहुसंख्येने उपस्थित राहून संपूर्ण कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे जाहीर आवाहन श्री दत्त प्रासादिक मंडळ व महिला मंडळ आंबेरे खुर्द पांचाळवाडी केले आहे. Dutt Jayanti at Ambere Khurd Panchalwadi
श्री दत्त जयंती उत्सवाचे निमित्त शुक्रवार दि. १३ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी १० वाजता श्रींच्या मुर्तीवर अभिषेक, आरती आणि तिर्थ प्रसाद, सायंकाळी ४ वाजता महिलांचे विविध मनोरंजनाचे कार्यक्रम, रात्रौ ९ वाजता आरती, भोवत्या आणि श्री. शेंबेकर गुरुजी यांचा किर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
शनिवार दि. १४ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी १० वाजता श्रींच्या मुर्तीवर अभिषेक, आरती, तिर्थ प्रसाद आणि सायंकाळी ५ वाजता श्री. शेंबेकर गुरुजी यांचा किर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे त्यानंतर श्री दत्त जन्मोत्सव सोहळा आणि रात्रौ ८ वाजता मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम आणि भजन, रात्रौ १० वाजता आरती, भोवत्या.
रविवार दि. १५ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी १० वाजता श्रींच्या मुर्तीवर अभिषेक, होमहवन, आरती आणि त्यानंतर दुपारी १ वाजता सर्वांसाठी महाप्रसाद ठेवण्यात आला आहे. त्यानंतर सायंकाळी ५ वाजता महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून रात्रौ ८ वाजता आरती, भोवत्या आणि शेंबेकर गुरुजी यांच्या किर्तनाचा कार्यक्रम, रात्रौ १०:३० वाजता रोहन पेडणेकर लिखित एकांकिका “पाझर”असा संयुक्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तरी संपूर्ण कार्यक्रमाला आंबेरे खुर्द पंचक्रोशीतील जनतेने बहुसंख्येने उपस्थित रहावे, असे जाहीर आवाहन श्री. दत्त प्रासादिक मंडळ व महिला मंडळ आंबेरे खुर्द पांचाळवाडी यांनी केले आहे. Dutt Jayanti at Ambere Khurd Panchalwadi