रत्नागिरी, ता. 11 : येथील पर्यावरण संस्था आयोजित निबंध स्पर्धेत महाविद्यालय गटातून स्वरा अरुण मुळ्ये प्रथम, माध्यमिक शाळा गटामध्ये वर्धन प्रकाश ओळकर आणि चित्रकला स्पर्धेत माध्यमिक गटातून पूर्वा अशोक कोलगे यांनी प्रथम क्रमांक पटकावला. या स्पर्धेचे बक्षीस वितरण रविवारी गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या डॉ. केळकर सेमिनार हॉलमध्ये करण्यात आले. Essay Competition by Environment Institute
मान्यवरांच्या हस्ते कुंडीतील रोपट्याला पाणी घालण्यात आले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे डॉ. सुमंत पांडे, डॉ. श्रीनिवास वडगबालकर, पर्यावरण संस्थेचे संस्थापक व माजी कुलगुरु डॉ. श्रीरंग कद्रेकर, संस्थाध्यक्ष व गोगटे महाविद्यालयाचे प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. सुरेंद्र ठाकुरदेसाई व्यासपीठावर उपस्थित होते. मरीन सिंडीकेटचे मरीनर दिलीप भाटकर यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला. मान्यवर व अशोक प्रभुदेसाई, डॉ. शरद प्रभुदेसाई आदींच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. Essay Competition by Environment Institute
निबंध स्पर्धेत महाविद्यालयीन प्रथम स्वरा मुळ्ये (अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालय), द्वितीय सावरी संजय झगडे (विजू नाटेकर कनिष्ठ महाविद्यालय), तृतीय श्वेता दिनेश डांगे (भाईशेठ म्हापुसकर कॉलेज, हातखंबा) यांनी यश मिळवले. माध्यमिक गटामध्ये प्रथम वर्धन ओळकर (फाटक हायस्कूल), प्रार्थन प्रशांत कामेरकर (सॅक्रेड हार्ट कॉन्व्हेंट स्कूल, शहर), स्वस्ति उमेश नागले (न्यू इंग्लिश स्कूल, पाली) यांनी यश मिळवले. चित्रकला स्पर्धेत प्रथम पूर्वा प्रशांत कोलगे (ब. प. विद्यालय, मालगुंड), द्वितीय आर्यन राकेश रंदापकर (सॅक्रेड हार्ट कॉन्व्हेंट स्कूल, शहर), ओम राजेश नितोरे (यशवंत माने माध्यमिक विद्यालय, निवळी) यांनी यश मिळवले. स्पर्धेच्या परीक्षक निवृत्त प्रा. सुजन शेंड्ये यांनी या वेळी मनोगतातून निबंधांविषयी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन डॉ. सोनाली कदम यांनी केले. जी. एस. कुलकर्णी यांनी आभार मानले. Essay Competition by Environment Institute