सहा तासात आरोपी गजाआड
गुहागर, ता. 07 : तालुक्यातील शृंगारतळी बाजारपेठ वेळंब रोड येथून काही अंतरावर असणाऱ्या कौंढर काळसूर रोडवरील शिगवणसडा शृंगारीमोहल्ला येथून धुनी भांडी व घरकाम करून कौंढर रस्त्याच्या मार्गे आपल्या घरी जात असताना तोंडाला रुमाल बांधलेल्या व डोक्यावर काळ्या रंगाची टोपी घालून सफेद स्कुटी गाडीवरून आलेल्या इसमाने शेजारी गाडी उभी करून महिलेच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन करून पलायन केल्याची घटना बुधवार दि. 4 रोजी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास घडली. Teasing of woman in Sringaratli
पीडित महिलेने तात्काळ गुहागर पोलीस स्थानकात तक्रार दिल्याने पोलिसांनी अवघ्या सहा तासाच्या आत सीसीटीव्ही फुटेच्या मदतीने आरोपीला गुहागर येथुन अटक केली आहे. पीडित महिलेने गुहागर पोलीस स्टेशन येथे त्वरित गुन्हा दाखल केल्यामुळे पोलिसांना त्याला पकडण्यात यश आले. Teasing of woman in Sringaratli
पोलिसांनी भा.द.वि.कलम ७४,७९ प्रमाणे गुन्हा दाखल करून आरोपी संकेत याला अटक करण्यात आली आहे. या घटनेचा अधिक तपास हे. कॉ. श्री. नलावडे करत आहेत. आरोपीला पकडण्यासाठी पोलीस निरीक्षक सचिन सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक सुजित सोनावणे, पोलीस उपनिरीक्षक भोपळे, पोलीस हवालदार वैभव चोगले, कुमार घोसाळकर, प्रितेश रहाटे, प्रथमेश कदम यांनी कामगिरी बजावली. Teasing of woman in Sringaratli