गुहागर, ता. 05 : पंचायत समिती गुहागर व तालुका अपंग पुनर्वसन संस्थेच्या संयुक्त विद्यमाने 3 डिसेंबर 2024 रोजी जागतिक दिव्यांग सहाय्यता दिन पंचायत समिती, गुहागर येथे मोठया उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने व शिव प्रतिमला पुष्पहार अर्पण करुन झाली. Disability Assistance Day at Guhagar
प्रास्ताविक करताना गटविकास अधिकारी श्री. केळंसकार यांनी दिव्यांगाना मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच पंचायत समिती व ग्रामपंचायत मधील दिव्यांगासाठी असणारा 5% निधी वेळेवर दिला जाईल याची दक्षता घेतली जाईल असे सांगितले. यावेळी पंचायत समिती व तहसील विभागातील विविध शासकीय योजनांची सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच दिव्यांगंना कायद्याचे ज्ञान मिळावे, दिव्यांगाचे हक्क व दिव्यांग अधिनियम 2016 ची माहिती तालुका विधी सेवा मार्फत ऍड सोमण मॅडम यांनी दिली. संस्थेचे अध्यक्ष श्री. उदय रावणंग यांनी दिव्यांगांच्या समस्या प्रकर्षाने मांडल्या. सर्व संबंधित शासकीय कर्मचाऱ्यांनी गरजू दिव्यांगाना त्यांच्यासाठी असणाऱ्या योजना मिळवून देण्यासाठी सहकार्य करावे. Disability Assistance Day at Guhagar
यावेळी तालुक्यातील अनेक ठिकाणी विविध उपक्रम व कार्यक्रम राबविण्यात आले. या कार्यक्रमाचे औचित्य साधून संस्थेच्या 22 व्या वार्षिक अहवालाचे उपस्थित मान्यवरांचे हस्ते प्रकाशन करण्यात आले. गेली 22 वर्षे केलेल्या कार्याचा अहवाल व ऑडिट सादर करणारी गुहागर तालुका अपंग पुनर्वसन संस्था ही एकमेव संस्था आहे. पंचायत समिती मार्फत उपस्थित गरजू दिव्यांगाना व्हीलचेअर्स, इतर आवश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले. Disability Assistance Day at Guhagar
या कार्यक्रमासाठी गटविकास अधिकारी श्री. केळंसकार, प्र.तहसीलदार श्री. सावर्डेकर, वकील सोमन मॅडम, अपंग संस्थेचे अध्यक्ष श्री.उदय रावणंग, संस्थेचे सल्लागार व गुहागर हायस्कूल चे प्राचार्य श्री सुधाकर कांबळे, पत्रकार श्री. सत्यवान घाडे, विस्ताराधिकारी श्री कांबळे, दिव्यांग व इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपस्थित सर्व मान्यवर, दिव्यांग बंधू आणि भगिनी तसेच संस्थेचे उपाध्यक्ष श्री. प्रकाश अनगुडे, खजिनदार श्री सुनील मुकनाक, सदस्य श्री. संतोष कदम, संदीप भाटकर, संतोष घुमे, भरत कदम, चंद्रशेखर लोखंडे, गीता पटेकर आदि सदस्यांनी मोलाचे सहकार्य केले. Disability Assistance Day at Guhagar