• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
31 August 2025, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

बेपत्ता मुले-महिलांच्या शोधासाठी ‘ऑपरेशन मुस्कान मोहीम’

by Guhagar News
November 30, 2024
in Maharashtra
97 1
0
Operation Muskan
190
SHARES
544
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

पुणे, ता. 30 : राज्याच्या वेगवेगळ्या शहरातून बेपत्ता झालेली मुले, तसेच महिलांच्या शोधासाठी पोलिसांकडून ‘ऑपरेशन मुस्कान १३’ ही विशेष मोहीम १ ते ३० डिसेंबर या कालावधीत राबविली जाणार आहे. या मोहिमेच्या अनुषंगाने पुणे पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतुक व्यापार प्रतिबंध कक्ष, गुन्हे शाखा, तसेच सर्व पोलीस ठाण्यांमध्ये विशेष पथकाची स्थापना करण्यात येणार आहे. Operation Muskan

या पथकाच्या माध्यमातून शहरातील सर्व पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकार्‍यांशी समन्वय साधण्यात येणार आहे. पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक, एक सहायक निरीक्षक, तीन पोलीस कर्मचार्‍यांचा या पथकात समावेश राहणार आहे. या मोहिमेअंतर्गत पुणे शहर, तसेच परिसरातून बेपत्ता झालेली मुले, तसेच तरुणींचा शोध घेण्यात येणार आहे. Operation Muskan

‘ऑपरेशन मुस्कान १३ ’ ही राज्यभरातील अल्पवयीन मुले आणि १८ वर्षावरील महिलांचा शोध घेण्यासाठी राबविण्यात आलेला एक प्रभावी उपक्रम आहे. पुणे शहरातील सर्व पोलीस अधिकार्‍यांना याबाबतचे आदेश देण्यात आले आहेत. एरवी शहरातून बेपत्ता झालेली लहान मुले, महिलांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून युद्धपातळीवर प्रयत्न करण्यात येतात. बेपत्ता झालेल्या व्यक्तींचा शोध घेण्यासाठी २४ तास आणि ३६५ दिवस प्राधान्य देण्यात आले आहे, असे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले. Operation Muskan

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarOperation MuskanUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share76SendTweet48
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.