गुहागर, ता. 28 : ऊर्जा संरक्षण पर राज्य स्तरीय चित्रकला प्रतियोगिता देशांतर्गत क्षेत्रातील ऊर्जा, कार्यक्षमता आणि ऊर्जा संवर्धनासाठी संवेदनशील करण्यासाठी ऊर्जा मंत्रालय (MOP)व भारत सरकार (GOI), यांच्यातर्फे घेण्यात आलेल्या राष्ट्रीय चित्रकला स्पर्धेत जि.प. पुर्ण प्रा. शाळा काताळे नं. १ मधील विद्यार्थी कु. वेदांत अशोक डिंगणकर याची राष्ट्रीय चित्रकला स्पर्धेत राज्यातून टॉप ५० मध्ये निवड करण्यात आली आहे. Success of Vedant Dingankar in Painting Competition
मुंबई येथे नुकतीच राष्ट्रीय स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेतमध्ये 828 शाळांनी यामध्ये सहभागी झाले होते. या स्पर्धेमध्ये 21 हजार 824 हून अधिक चित्रकार मुलांनी भाग घेतला होता. यामधून राज्यस्तरासाठी टॉप 50 मुलांची निवड करण्यात आली. या राष्ट्रीय स्पर्धेत मध्ये वेंदातने आपली चुणूक दाखवली. यासाठी त्याला राष्ट्रीय स्तराचे प्रमाणपत्र व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. Success of Vedant Dingankar in Painting Competition
वेदांतला लहानपणापासून चित्रकलेची आवड आहे. आपल्या कलेची जोपासना करत जिद्द, चिकाटी यांच्या जोरावर त्यांने राष्ट्रीय स्तरावर सुयश संपादन केले आहे. या यशामध्ये मागदर्शन मुख्याध्यापिका श्रीमती माधवी पाटील, श्री. सोनवलकर सर, चव्हाण सर, कांबळे सर यांनी सहकार्य केले. या यशाबद्दल काताळे शाळा व्यवस्थापन समिती, निर्मल ग्रामपंचायत काताळे, काताळे शाळा शिक्षण वर्ग – पालक वर्ग, गटशिक्षण अधिकारी श्री. नितीन गळवे, बीट विस्तार अधिकारी श्री. विश्वास खर्डे, पडवे उर्दू केंद्रप्रमुख श्री . परवेज चिपळूणकर यांनी अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. Success of Vedant Dingankar in Painting Competition