• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
8 June 2025, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

राजेश बेंडलांचा झालेला पराभव जिव्हारी लागणारा

by Ganesh Dhanawade
November 25, 2024
in Guhagar
325 3
0
Guhagar assembly polls

निलेश सुर्वे

637
SHARES
1.8k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

निलेश सुर्वे; महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या मेहनतीला सलाम

गुहागर, ता. 25 : गुहागर विधानसभा मतदारसंघांमध्ये महायुतीचे उमेदवार राजेश बेंडल यांचा अवघ्या 2821 मतानी झालेला पराभव हा महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागला आहे. मात्र याचबरोबर महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी बेंडल यांना एवढी प्रचंड मतं मिळवून देताना जी मेहनत केली आहे, त्या मेहनतीला सलाम असल्याचे भाजपाचे तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे यांनी सांगितले. Guhagar assembly polls

गुहागर विधानसभा मतदार संघात विद्यमान आमदार भास्कर जाधव यांनी विधानसभेच्या रणधुमाळीला सुरुवात होतानाच या विधानसभा मतदार संघात मला विरोधकच नाही, माझ्यासमोर कोण उभच राहू शकत नाही, जर उभा राहिला तर त्याला असा लोळवतो की, तो पुन्हा उभाच राहणार नाही. आणि कोणी जरी लढला तरी माझे मताधिक्य हे 50 हजाराच्या वरचे असेल अशा वल्गना केल्या होत्या. मात्र या विधानसभेत भाजपाचे पालक रविंद्र चव्हाण, पालकमंत्री उदय सामंत, माजी आमदार डॉ.विनय नातू, आमदार रविंद्र फाटक, जिल्हाध्यक्ष केदार साठे, नगरसेवक राजेश मोरे, भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी, आरपीआय, कुणबी सेना, बळीराज सेना आणि सर्व घटक पक्षांच्या मदतीने राजेश बेंडल यांच्या नेतृत्वात महायुतीने अशी काही मोट बांधली की विद्यमान आमदारांना विजयासाठी घाम फोडला आणि यातच विद्यमान आमदारांना आपण 17 वर्ष नेतृत्व करत असताना कोणत्या स्तराला आहोत, याची जाणीव करून दिली, असे सुर्वे म्हणाले. Guhagar assembly polls

गुहागर विधानसभेत मी आणि मीच आहे. माझ्याशिवाय दुसरा कोणी नाही, अशी ज्यांची भावना होती, त्यांना या विधानसभेतील मतदारांनी जागेवर आणले. मग मोदीजींच्या योजना असतील किंवा महाराष्ट्र राज्याच्या शिंदे साहेब, फडवणीस साहेब, अजितदादांच्या जनतेच्या सर्वांगीण विकासाच्या योजना असतील यांची टिंगल टवाळी करतानाच या योजना कशा चुकीचे आहेत हे वारंवार सांगण्याचा प्रयत्न केला. पण  महाराष्ट्रातील महायुती सरकारच्या लाडक्या बहिणी असतील किंवा योजनांचे अनेक लाभार्थी असतील यांनी सडेतोड उत्तर मतयंत्रातूनच दिले आहे. नशिबाने थोडीशी हुलकावणी दिल्यामुळे राजेश बेंडल यांचा पराभव झाला असला तरी महाराष्ट्रात महायुतीचे भक्कम सरकार आले असल्यामुळे गुहागर तालुक्यातील नव्हे तर गुहागर विधानसभा मतदारसंघातील जनतेने बिनधास्त राहावे. सर्वांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने, शैक्षणिक विकासाच्या दृष्टीने, आरोग्याच्या दृष्टीने, विकास कामांच्या दृष्टीने, रोजगार निर्मितीच्या दृष्टीने, कौशल्य विकासाच्या दृष्टीने महायुतीच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी ही कायमच चार पावले पुढे राहील, असे भाजपाचे तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे यांनी सांगितले. Guhagar assembly polls

Tags: BJPChief Minister Eknath ShindeGuhagarGuhagar assembly pollsGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMaharashtra Navnirman SenaMarathi NewsMLA Bhaskar JadhavMNSNews in GuhagarRajesh BendalShiv SenaUpdates of GuhagarVikrant Jadhavआमदार भास्कर जाधवगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्याभाजपमनसेमराठी बातम्यामहाराष्ट्र नवनिर्माण सेनामुख्यमंत्री एकनाथ शिंदेराजेश बेंडललोकल न्युजविक्रांत जाधवशिवसेना
Share255SendTweet159
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.