गुहागर ता. 19 : खेड तालुक्यातील लोटे एम.आय.डी.सी. येथील लोटेमाळ येथे गैरकायदा विनापरवाना ७५००/- रुपये किंमतीची ७० लीटर गावठी हातभट्टीची दारू व २०/- रुपये किंमतीचे दारूचा वास असलेला एक काचेचा ग्लास असा गावठी हातभट्टीची दारू विक्री करण्याच्या उद्देशाने कब्जात बाळगलेल्या स्थितीत रंगेहाथ मिळून आला. ही कारवाई दि.१७ नोव्हेंबर २०२४ रोजी सायंकाळी ६:५० वाजता करण्यात आली. Gavathi liquor confiscated at Lotemaal

रत्नागिरी येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस हवालदार प्रविण कृष्णा खांबे यांनी खेड पोलीस स्थानकात फिर्याद दिल्यानंतर आरोपी याच्याविरोधात गुन्हा रजि. नं. ३८१/२०२४, महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम १९४९ कलम ६५(ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Gavathi liquor confiscated at Lotemaal
