डॉ. विनय नातू
गुहागर, ता. 02 : गुहागर विधानसभा मतदारसंघासाठी महायुतीमधून गुहागरची जागा ही भाजपाला सुटणार हे निश्चित होते. परंतु उमेदवारीचा चेहरा नसतानाही गुहागरच्या जागेवर हक्क दाखवून महायुती मधील घटक पक्षांना विश्वासात न घेता त्या ठिकाणी दुसऱ्या पक्षातील उमेदवार घेऊन जर उमेदवार देत असतील तर निष्ठेने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी कसे काम करावे, असा सवाल भाजपचे माजी आमदार डॉक्टर विनय नातू यांनी केला आहे. तसेच लोकसभेपासूनच ओबीसी उमेदवार द्यायचा असे बोलून कूटनीतीचे राजकारण सुरु असल्याचे ते म्हणाले. Guhagar Assembly Election
गुहागर विधानसभा मतदार संघासाठी महायुती मधून शिवसेनेतून राजेश बेंडल यांना उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर भाजपातून प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे. अशावेळी गुहागर विधानसभेचे उमेदवार म्हणून दावेदार असलेले भाजपाचे माजी आमदार डॉ. विनय नातू यांनी पत्रकारांजवळ बोलताना भाजपाला जागा सोडण्याचे निश्चित झाले असताना दोन दिवसापूर्वी अचानक राजेश बेंडल यांच्या नावाने उमेदवारी अर्ज दाखल होतो. यामुळे भाजपाला जिल्ह्यामध्ये एकही जागा सोडली गेली नसल्याने भाजपामध्ये प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे. गुहागर नगरपंचायती नंतर पहिल्यांदाच स्वर्गवासी सदानंद आरेकर, स्वर्गवासी रामभाऊ बेंडल, स्वर्गवासी तात्यासाहेब नातू केसरकर यांच्या नावाचा उल्लेख नेत्यांच्या तोंडातून झाला. पालकमंत्री तर उमेदवाराला विजयानंतर विमानातून घेऊन जाणार आहेत अशी घोषणा केली गेली. Guhagar Assembly Election
मतदानासाठी वीस दिवस शिल्लक असतानाही आपल्याबरोबर पालकमंत्र्यांची भेट झालेली नाही. यामुळे कोणतेही बैठक अद्याप महायुतीची झालेली नसून पुढील दोन-तीन दिवसांमध्ये काय घडते याची प्रतीक्षा करावी लागणार आहे. आज भाजपाच्या वतीने जिल्ह्यामध्ये एकही जागा दिली गेली नसताना आणखीन कोणती मागणी आपल्या पक्षाकडे करायची आणि ती मान्य होईल असे येथील कार्यकर्त्याला वाटत नाही. महायुतीमध्ये घटक पक्षाला सहभागी करून न घेता दुसऱ्या पक्षातील उमेदवार उचलून महायुतीचा उमेदवार म्हणून अर्ज भरून इतर घटक पक्षाला विश्वासात न घेतल्याने हे कोणते राजकारण महायुतीमध्ये खेळले जात आहे असेही स्पष्टीकरण केले रामदास भाईंनी लोकसभेमधील प्रचार सभांमधून विधानसभे करता कुणबी समाजाचे चेहरा देण्याचे भाकीत केले होते. ते खरे करण्याकरता कुठनीतीचे राजकारण खेळले गेले असल्याचेही डॉ. नातू यांनी यावेळी स्पष्ट केले. Guhagar Assembly Election